पोस्ट्स

सांभाळून रे

इमेज
काही शब्द इतके मार्मिक असतात की ते कमी बोलता बरंच काही सांगून जातात. “अभ्यास कर”, “मेहनत कर”, “खरं बोल”, “सुखी राहा”, “घाबरू नको”, “जसं आहे तसं समाधानी व निरोगी राहा”, “उगाच वाद नको”, “ताण कशाला घेतोस?”, “मोठ्यांचा आदर कर”, “गरिबाला मदत कर”, “पाणी-अन्न दे”, “बाहेर गेलास तर सांभाळून राहा रे”, “मुक्या प्राण्यांवर दया कर”, “भजन कर, देवाचं नामस्मरण घे बाळा” असा मोठ्यांचा आपल्या लेकरांना नेहमीच सल्ला असतो. आम्ही लहान होतो तेव्हा उडानटप्पू, भिल्लरी, हातात काठी, कधी दगड-गोटे… मग काय, एका झाडावर दगड टाक, दुसऱ्या झाडावर मार, कधी सरडा मार, तर कधी आंबा पाड! सुसाट धावत सुटायचो.  घरच्यांना काळजी वाटायची“पोरं कुठं गेली, काय करत असतील?” कधी तळ्यात उड्या, कधी विहिरीत पोहायला, तर कधी शिकारीच्या मागे. या सगळ्यात कधी एखादी घटना घडायची, पण तेव्हा त्याची फारशी फिकीर नसायची. पण काही वेळा अशाच निष्काळजीपणामुळे गंभीर प्रसंग घडतात. सुट्टी लागली की मुलं तळ्यात, नदीत पोहायला जातात आणि दुर्दैवाने काही मुलं बुडून मृत्युमुखी पडतात.  मुलांना त्या वेळी त्याचं गांभीर्य कळत नाही; पण त्याचा परिणाम खूप भयंकर होत...

वेदना

इमेज
भगवान श्रीराम यांचे रामायण आपल्याला माहित आहे, आणि ज्ञातही आहे काय झालं, कसं घडलं, कशामुळे घडलं आणि काही असूनही असं का घडलं? हे क्षत्रिय लोक म्हणजे आपलेच म्हणा. शबरी, भिल्ल, वनवासी सर्वांनी भगवान श्रीराम यांच्या वनवासात साथ दिली.  पण एखाद्या पट्टराणीने दिलेल्या शब्दामुळे आणि स्वार्थामुळे माणूस किती लाचार व्हावा? किती आज्ञा पाळाव्या? किती बंधुप्रेम ठेवावं? समाजासाठी काय करावं?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कथेमध्ये दडलेली आहेत. दशरथ राजाला श्रावणबाळाच्या घटनेनंतर मिळालेला शाप तिथून या वेदनेची सुरुवात झाली. पुढे पूजा-अर्चा करून भगवान जन्माला आले, शिक्षण झाले, ज्ञान प्राप्त झाले सर्व काही उत्तम घडलं. पण एखाद्याला दुखावल्यानंतर होणारा पश्चाताप कायम राहतो, हेही यातून दिसून येतं. खरं प्रेम केलं, आदर केला तर भरतासारखा भाऊ मिळतो, आणि जीवाला जीव देणारा लक्ष्मण भेटतो.  सीता ही जनकाला मिळालेली कन्या तिच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण शेवटी भगवान श्रीराम यांनीच ते कार्य पूर्ण केलं. भगवंत असूनही भगवान श्रीराम यांना किती वेदना सहन कराव्या लागल्या हे फक्त त्यांनाच ठाऊक. ते क्षणात सर्व काही...

गेला उडत… (एक सामाजिक वास्तव)

इमेज
पूर्वी असे काही माणसं होती, ज्यांच्या चांगल्या गुणांचं नाव अजूनही जिवंत आहे. त्यांनी समाजासाठी क्रांती केली, समाजाचं हित पाहिलं. प्रसंगी रक्त सांडलं, पण निस्वार्थीपणे लढत राहिले.  सामाजिक, आर्थिक आणि माणुसकीची व्यापक मानसिकता जपण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं.  त्यांच्या कार्याबद्दल ऐकलं, वाचलं की ते आपल्याला एक दिशा देणारं ठरतं. म्हणून त्यांच्या कार्याला करावा तेवढा सलाम कमीच आहे. आपल्या गावातही अशी माणसं होऊन गेली. एक पेटी मास्तर होता चांगला गायचा, सुंदर भजन म्हणायचा. त्याचा आवाज ऐकला की मन प्रसन्न व्हायचं. त्याचबरोबर तो एक शिक्षक होता,आणि एक सामाजिक कार्यकर्ता देखील होता.  पुढे गावचा पोलीस पाटील, सरपंच म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली. तो एक आदर्श, दिशादर्शक व्यक्तिमत्त्व होता. त्याच्या शब्दांना धार होती; त्याचं बोलणं ऐकलं की माणूस विचार करायला भाग पडे. अशा अनेक व्यक्ती आपण आपल्या परिसरात पाहिल्या आहेत. कोणी कुस्तीगीर, कोणी नाटककार, कोणी शिंपी, कुंभार, चांभार, तर कोणी व्यापारी किंवा दुकानदार. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात समाजासाठी काहीतरी दिलं. आपल्या समाजातील राघोजी भ...

जीवन आदिवासी जमातीचे

इमेज
जीवन जगणाऱ्या जमाती  जल, जंगल आणि जमीन यांचे खरे वारसदार  पूर्वीपासून डोंगरदऱ्यांमध्ये राहत आले. आजही त्यांची परिस्थिती फारशी बदललेली नाही. उलट, त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणांवरून हलवून पुन्हा त्याच डोंगरदऱ्यांमध्ये ढकलले जात आहे. हा अन्याय किती काळ चालणार? स्वतंत्र विभाग, योजना, घोषणा हे सगळं कागदावर आहे. पण प्रत्यक्षात मात्र काहीच बदल दिसत नाही. वास्तव इतकं कटू आहे की ते सांगताना मन सुन्न होतं. शंकराची कहाणी – श्रमाचा अपमान “शंकरा, तुझी बायको-पोरं उपाशी आहेत ना? मग ये इथे काम कर…” शंकर दिवसभर उन्हात काम करतो. पाण्याचा घोट घेऊन, उपाशीपोटी काम पूर्ण करतो. संध्याकाळी मजुरी मागतो— “शेठ, माझे पैसे द्या…” पण उत्तर मिळतं “तुला एवढंच काम सांगितलं होतं… हे घे ५० रुपये आणि निघ!” दोनशे रुपयांच्या कामाचे फक्त पन्नास रुपये. विरोध केला तर शिवीगाळ, मारझोड. तरीही शंकर ते पैसे घेऊन घरी जातो… कारण पोरं उपाशी असतात. गंग्याची मुलगी – असुरक्षिततेची वेदना “गंग्या, तुझी मुलगी मोठी झाली ना? पाठव कामाला… थोडं हातभार लागेल.” गरीबीमुळे गंग्या तयार होतो. मुलगी कामासाठी वाड्यावर जाते. पण तिथे तिच्यावर पड...

पाहणी

इमेज
धोंडू नावाचा एक कष्टकरी माणूस गावात आपल्या कुटुंबासह राहत होता. आयुष्यातील अनेक संकटे, कर्जबाजारीपणा आणि परिस्थितीच्या ताणामुळे अखेर धोंडू आणि त्याच्या कुटुंबाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडते. त्या घटनेनंतर त्याचा मुलगा सुरेश याच्या आयुष्यात संघर्षाची खरी सुरुवात होते. सुरेश शिक्षण घेतो, नोकरीच्या शोधात भटकतो; परंतु त्याला कुठेही स्थिर नोकरी मिळत नाही. अशातच तालुक्याच्या ठिकाणी त्याची एका आपतग्रस्त मुलीशी ओळख होते. ती मुलगी घरातून पळून आलेली असते आणि दोघांमध्ये ओळख वाढत जाऊन ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. दोघेही एकमेकांच्या साथीने आयुष्य जगण्याचा निर्धार करतात. नोकरी मिळत नसल्यामुळे सुरेश शेवटी आपल्या गावी परत येऊन शेती करण्याचा निर्णय घेतो. मेहनतीने शेती करत असताना गावातील लोकांचा त्याच्यावर विश्वास बसतो आणि पुढे तो गावचा सरपंच म्हणून निवडून येतो. सरपंच झाल्यानंतर सुरेश प्रामाणिकपणे काम करू लागतो. गावात कोणी चोरीने लाकूडतोड करत असेल, सरकारी मालमत्तेचे नुकसान करत असेल किंवा कोणतेही बेकायदेशीर काम करत असेल तर तो लगेच पोलीस तक्रार करतो. त्यामुळे गावातील काही गावगुंड आणि राजकीय स्...

कुठे माझी बहीण चंद्रभागा?” – एक वेदनादायी हकीकत

इमेज
पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश आहेत म्हणून आपण आहोत.” सूर्य आपल्याला प्रकाश देतो, पण कधी त्याची किंमत मागत नाही. नद्या, नाले, विहिरी आपल्याला पाणी देतात, पण आपण किती वापर केला याचा हिशोब ठेवत नाहीत. निसर्ग आपल्या प्रत्येक कृतीला शांतपणे सहन करतो—आपण किती झाडं तोडली, किती डोंगर फोडले, किती जीव नष्ट केले याचा तो कधी हिशोब मागत नाही. पण आपण कधी विचार केला का? आपल्या विकासाच्या नावाखाली किती खेकडे, माकडं, साप, पक्षी आणि इतर जीव चिरडून मरतात? आपल्या आजूबाजूचा प्रत्येक जीव आपल्यासारखाच जिवंत आहे—ही साधी जाणीव आपण विसरत चाललो आहोत. माझी आजी नेहमी सांगायची, “बाळा, जसा आपल्याला जीव आहे, तसाच प्रत्येक सजीवाला असतो. नद्या – आपल्या जीवनदायिनी माता भारत देश नद्यांचा देश आहे. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, कृष्णा, भीमा, कावेरी, नर्मदा, चंद्रभागा—या सर्व नद्या आपल्याला जीवन देतात. डोंगरातून उगम पावून त्या हजारो किलोमीटर प्रवास करतात, गाव-तालुका-जिल्हा-राज्य ओलांडत अखंड वाहत राहतात. नाशिकच्या पंचवटीत श्रीराम यांचे वास्तव्य होते, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. सीतेचे अपहरण करताना रावणाशी जटायू यांनी केलेला ...

कच

इमेज
आई-वडील नसलेला दामू मामाच्या सहकार्याने शाळेत बारावीपर्यंत शिकला. त्यानंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. कोर्स करत असताना एका गरीब घरातील मुलीशी त्याची ओळख झाली. त्या मुलीचे नाव सारिका होते. सारिकाला आई नव्हती, वयस्कर वडील होते आणि एक टपोरी स्वभावाचा भाऊ होता. दामूची परिस्थिती चांगली नसल्याने कोर्स पूर्ण झाल्यावर तो एका हॉटेलमध्ये काम करू लागला. त्या हॉटेलच्या मालकाची मुलगी सुंदरा दहावी-बारावी शिकत होती. दामूचा प्रामाणिकपणा, कामातील चपळाई आणि साधा स्वभाव पाहून सुंदरा त्याच्याशी आदराने बोलू लागली. ही गोष्ट तिच्या वडिलांच्या लक्षात आली. दरम्यान सारिकाचा भाऊ अंत्या टपोरी स्वभावाचा होता. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले की दामू हॉटेलमध्ये काम करतो आणि तुझ्या बहिणीकडे लक्ष देतो. एके दिवशी अंत्या काही मुलांना घेऊन हॉटेलमध्ये आला आणि दामूला मारहाण केली. दामूने मात्र काहीही प्रतिकार केला नाही. ही घटना झाल्यानंतर हॉटेल मालकाने दामूला कामावरून काढून टाकले. तेव्हा सुंदरा त्याला म्हणाली, “काळजी करू नकोस. माझे मामा तालुक्यात आहेत. त्यांच्या हॉटेलमध्ये तुला काम देते.” दामू तिथे गेला आणि पुन...