कच
आई-वडील नसलेला दामू मामाच्या सहकार्याने शाळेत बारावीपर्यंत शिकला. त्यानंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. कोर्स करत असताना एका गरीब घरातील मुलीशी त्याची ओळख झाली. त्या मुलीचे नाव सारिका होते. सारिकाला आई नव्हती, वयस्कर वडील होते आणि एक टपोरी स्वभावाचा भाऊ होता.
दामूची परिस्थिती चांगली नसल्याने कोर्स पूर्ण झाल्यावर तो एका हॉटेलमध्ये काम करू लागला. त्या हॉटेलच्या मालकाची मुलगी सुंदरा दहावी-बारावी शिकत होती. दामूचा प्रामाणिकपणा, कामातील चपळाई आणि साधा स्वभाव पाहून सुंदरा त्याच्याशी आदराने बोलू लागली. ही गोष्ट तिच्या वडिलांच्या लक्षात आली.
दरम्यान सारिकाचा भाऊ अंत्या टपोरी स्वभावाचा होता. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले की दामू हॉटेलमध्ये काम करतो आणि तुझ्या बहिणीकडे लक्ष देतो. एके दिवशी अंत्या काही मुलांना घेऊन हॉटेलमध्ये आला आणि दामूला मारहाण केली. दामूने मात्र काहीही प्रतिकार केला नाही.
ही घटना झाल्यानंतर हॉटेल मालकाने दामूला कामावरून काढून टाकले. तेव्हा सुंदरा त्याला म्हणाली,
“काळजी करू नकोस. माझे मामा तालुक्यात आहेत. त्यांच्या हॉटेलमध्ये तुला काम देते.”
दामू तिथे गेला आणि पुन्हा काम करू लागला.
मात्र सारिका दामूवर मनापासून प्रेम करत होती. तिने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली आणि एके दिवशी कुणालाही न सांगता ती दुसऱ्या तालुक्यात दामूकडे गेली. दोघांनी लग्न केले.
ही बातमी सुंदराला कळली तेव्हा तिला खूप वाईट वाटले. दरम्यान सुंदरा मोठी झाली होती. तिच्या मामाच्या मुलाकडून तिची मागणी आली. सुंदराला इच्छा नसतानाही आणि तिला तो मुलगा आवडत नसतानाही तिचे लग्न अनिल नावाच्या त्या मुलाशी झाले.
अनिल फ्रान्समध्ये एका मोठ्या कंपनीत अधिकारी म्हणून काम करत होता. लग्नासाठी तो सुट्टी काढून भारतात आला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवस दोघांचा संसार सुरू झाला. पण सुट्टी संपल्यामुळे अनिल पुन्हा फ्रान्सला निघून गेला. सुंदरा भारतातच राहिली. कधी सासरी, कधी आई-वडिलांकडे तर कधी दामूला भेटायला ती जात असे. तिच्या विवाहित जीवनात मोठी घालमेल सुरू होती.
बराच काळ अनिल भारतात आला नाही. दरम्यान दामूची आणि अनिलची ओळख होती. एकदा अनिलने दामूला सांगितले होते,
“तू एवढं चांगलं हॉटेलचं काम करतोस, मग परदेशात का येत नाहीस?”
हे लक्षात ठेवून दामूने स्वतःचा आणि आपल्या बायकोचा म्हणजे सारिकाचा पासपोर्ट काढला. त्याने सुंदराला सांगितले,
“आम्ही आता इथे काम करणार नाही. फ्रान्सला तुझ्या नवऱ्याकडे जात आहोत.”
सुंदरा म्हणाली,
“मलाही तुमच्या बरोबर यायचं आहे.”
दोन-तीन दिवसांत तिचाही पासपोर्ट काढला गेला आणि ही तिन्ही मंडळी फ्रान्सला निघून गेली. सुंदराने ही बातमी आई-वडिलांना किंवा सासरच्यांना सांगितली नव्हती.
फ्रान्समध्ये उतरल्यावर ते एका मोठ्या कंपनीच्या प्लांटजवळ गेले. नदीकाठी मोठा कारखाना होता आणि तिथे प्रचंड सुरक्षा होती. गॅस आणि तेल साठ्यामुळे तो अतिशय संवेदनशील भाग होता. तिथे अनिल मोठा अधिकारी होता, पण हे कोणालाच माहीत नव्हते.
नदीकाठी ही तिन्ही माणसं बसलेली पाहून राऊंडवर असलेल्या अनिल आणि त्याच्या स्टाफने त्यांना सांगितले,
“इथे बसण्यास परवानगी नाही. निघून जा.”
मात्र ते हलले नाहीत. परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि हवेत गोळी झाडण्यात आली. ती चुकून सारिकाला लागली
पोलिसांना वाटले की ते लोक निघून जातील आणि ते पुढे गेले. पण सारिकाला गोळी लागली होती. कसंबसं ते तिघे कुंपणाच्या आत गेले. सारिकाच्या खांद्याला गोळी चाटून गेली होती आणि रक्त वाहत होते. तिला तिथे बसवून दामू आणि सुंदरा औषध-पाणी आणण्यासाठी बाहेर गेले.
दरम्यान पाईपलाइनमध्ये अडथळा निर्माण झाला आणि कंपनीचा सायरन वाजला. धावपळ सुरू झाली. दामू आणि सुंदरा अंधारात पळू लागले. एका ठिकाणी दामू थांबला आणि त्याने विडी पेटवली. त्यातून गॅस लाईनला प्रचंड आग लागली. कंपनीत मोठी दुर्घटना घडली. घाबरून दोघेही रातोरात रेल्वेने दुसऱ्या शहरात निघून गेले.
इकडे सारिका मात्र तिथेच पडून होती. शोधाशोध झाली आणि ती सापडली. तिच्याकडे कोणतेही सामान नव्हते. फक्त ओळखपत्र आणि काही भारतीय रुपये होते. ती बेशुद्ध अवस्थेत होती.
सारिका दिसायला सुंदर होती. अनिलने तिला आपल्या गेस्टहाऊसमध्ये नेले आणि तिच्यावर उपचार केले. दोन-तीन दिवसांनी ती शुद्धीवर आली. चौकशी झाल्यावर तिने सगळं सत्य सांगितलं. तोपर्यंत ती अनिलकडेच राहत होती.
दरम्यान कंपनीत झालेल्या घटनेची चौकशी सुरू झाली. भारत आणि फ्रान्स पोलिसांमध्ये संपर्क झाला. तपास करताना दामू ज्या हॉटेलमध्ये काम करत होता त्याचा धागा सापडला. शेवटी पोलिसांनी दामूला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो पळताना झालेल्या चकमकीत ठार झाला.
दरम्यान दामू आणि सुंदरा दुसऱ्या शहरात राहत होते. त्यांच्या सहवासातून त्यांना एक मुलगा झाला. दामूला सारिकाची खूप आठवण येत होती, पण तिचं काय झालं हे त्याला कधीच कळलं नाही.
नंतर सुंदरा आपल्या मुलासह पुढे आली. अनिलने सारिका आणि सुंदराला भारतात आणले. भारतात आल्यानंतर अनिलच्या मनातही सारिकाबद्दल प्रेम निर्माण झाले.
अनिल तिला तिच्या वडिलांकडे घेऊन गेला. वडील म्हणाले,
“बाळा, आता तिचा नवरा गेला आहे. तूच तिचा सांभाळ कर.”
हे बोलून त्यांनी तिथेच प्राण सोडले.
नंतर अनिलने सारिकाला आपल्या घरी आणले आणि सर्व गोष्ट आई-वडिलांना सांगितली. सुंदरा देखील म्हणाली,
“आता तिचाही सांभाळ कर.”
अशा प्रकारे या कथेत जीवनातील तळमळ, प्रेम, मदत आणि प्रसंग यांचे अनेक उलटसुलट रंग दिसतात. काहीजण परिस्थितीसमोर कच खाऊन जगले, तर काहींनी त्यातून नव्याने जीवन उभे केले.
सुदाम मदगे (किवळे,अंदर मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा