ग्रामीण जीवनाचे फिरते चक्र
आज गावाकडच्या जीवनात वर्षभर एक वेगळाच ताल दिसतो. नित्याची कामं, शेती, सण-उत्सव आणि माणुसकी यांचं एक सुंदर चक्र सतत फिरत असतं. आता धार्मिक लग्नकार्य, जत्रा मोठ्या प्रमाणात होत असतात. काही महिन्यापूर्वी काढलेलं भात किंवा इतर धान्य दळून, कांडून कनगुलीमध्ये तर तट्ट्याने केलेले धान्य साठवण्याचे गोडाऊन दाराच्या अंगणामध्ये ठेवले जातात. हे साठ्याची वखर अंगणातच असते. उन्हाळ्याच्या दिवसांत अंगणातच माणसं झोपतात. त्या अंगणातच गप्पा, भेटीगाठी आणि नात्यांची ऊब जपली जाते. काही दिवसानंतर ही धार्मिक कार्य संपतात. एका बाजूला गुराढोरांसाठी वैरण साठवण्याची कामं चालू होतात, तर दुसऱ्या बाजूला पावसाळ्यासाठी लाकूडफाटा जमा करणे सुरू असतं. त्याचबरोबर शेतात असलेला घेवडा, मसूर व हरभरा काढण्याची लगबग देखील चालू असते. या काळात माणसं थोडी मोकळी असतात, त्यामुळे गावोगावी येणं-जाणं वाढतं. नातलगांच्या कार्यक्रमांमध्ये लोक एकमेकांना भेटतात. या नात्यांमध्ये माणसं आपली माणुसकी जपतात आणि आपुलकीने घरादारी उठबस करतात. हे तात्पुरतं सुख असलं तरी आयुष्यात बरंच काही देऊन जातं. यानंतर भाजणीचे दिवस येतात. मग गवत राब जमा करणे, पेरणी...