पोस्ट्स

ॲक्शन आणि म्युझिकल फिल्म मोहरा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ॲक्शन आणि म्युझिकल फिल्म मोहरा

इमेज
१ जुलै १९९४ ला मोहरा रिलीज झाला होता. तू चीज बडी है मस्त मस्त ह्या गाण्याने त्या काळात धुमाकूळ घातला होता. रिक्षा, रसवंती गृह, कटिंग सलून आणि घरोघरी हेच गाणं लूप वर वाजत होतं.  ना कजरे की धार,  सुबह से लेकर शाम तक.. मुझे प्यार करो, आणि एक स्पेशल गाणं, जे आम्हाला तेव्हा चोरून बघावं लागायचं.( ते टिव्ही वर लागलं की चॅनल बदललं जायचं किंवा VCR वर पाहत असल्यास फास्ट फॉरवर्ड केलं जायचं. ) ते आयकॉनिक गाणं " टीप टीप बरसा पानी"  एकंदर सगळीच गाणी जबरदस्त असल्यामुळे त्याची ऑडिओ कॅसेट खूप खपली.  राजीव राय ह्या गुणी दिग्दर्शकाने आणि त्रिमूर्ती फिल्म्स ह्या त्याच्या प्रॉडक्शन हाऊस ने विश्वात्मा , त्रिदेव, गुप्त, यांसारखे क्लासिक सिनेमे दिले आहेत. विजू शाह ह्या त्याच्या आवडत्या म्युझिक दिग्दर्शकाने ह्या सगळ्याच सिनेमात अजरामर गाणी आणि संगीत दिलेलं आहे.  मोहरा हा एक कमालीचा भारी ॲक्शन ड्रामा आहे. त्या काळात सगळे अभिनेते एकमेकांबरोबर गुण्या गोविंदाने नांदायचे ( गोविंदा सुद्धा ) त्यामुळे अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ही प्रेक्षकांची अतिशय आवडती जोडी घेऊन मोहरा काढण्यात आला तेव्हा ...