पोस्ट्स

दुष्काळ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सरकार, आता थांबा… (एक वेदनादायी हाक)

इमेज
अहो सरकार, आज मी तळमळीने आणि मनाच्या खोल वेदनेतून बोलतो आहे… ही जल, जमीन आणि जंगल — ही आमची नाहीत, पण आम्हीच त्यांचे खरे राखणदार आहोत. पिढ्यानपिढ्या आम्ही त्यांची काळजी घेतली, मायेसारखी जपणूक केली. या निसर्गानेही आम्हाला कधीच कमी पडू दिले नाही. उपजीविकेसाठी फळे, फुले, औषधे, पाणी, धान्य — सर्व काही त्याने मुक्तपणे दिले. या डोंगरांनी आम्हाला आपल्या अंगाखांद्यावर खेळवले. नद्या-नाल्यांनी पाणी दिले. जमिनीने अन्न दिले. कधीच त्यांनी आपल्याकडून काही मागितले नाही. पाण्याने कधी पैसे मागितले का? झाडांनी दिलेल्या श्वासासाठी भाडं मागितलं का? जमिनीने कधी तक्रार केली का की “माझ्यावर जखमा करू नका”? नाही… कारण हा निसर्ग म्हणजेच खरी देवता आहे. पण आज आपण काय करतोय? झाडे तोडतोय, नद्या बुजवतोय, विहिरी गाडतोय, सुपीक जमीन नष्ट करतोय… ज्या निसर्गाने आपल्याला जगायला शिकवले, त्यालाच आपण नष्ट करायला निघालो आहोत. पूर्वी माळरानावर, डोंगरदऱ्यांत, खुल्या हवेत राहणारे आम्ही… आज उघडे पडलो आहोत. पशु-पक्षी सैरभैर झालेत. त्यांची घरटी उद्ध्वस्त झालीत. त्यांच्या संसाराचा चुराडा झाला आहे. ते कुठे जातील? कसे जगतील? माणसांच्य...