शेवटी हत्यार खाली ठेवली
आमचा सर्व कामधंदा आणि गुजराण ही जंगल-वनस्पती, डोंगर-दऱ्यांमध्येच. जे काय मिळेल तेच काही दिवसांची शिदोरी. वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या आम्ही हेच काम करत आलो. नदी-नाले ओलांडले, आणि त्यामधून जे मिळेल तेच पोटाची शिदोरी. पण हे जंगल आहे म्हणूनच आमचं गुजराण झालं. आमच्या गुराढोरांना चारा मिळाला, आम्हाला लाकडं-फाटा मिळाला, औषध मिळालं. या जल-जंगल संपत्तीने आम्हाला बरंच काही दिलं. आम्ही त्याला डोंगर देव, वाघ देव मानलं. जंगलातले प्राणी-पक्षी हे तर आमचं शिकारीचं साधन. आम्ही बराच अत्याचार केला त्यांच्यावर. त्यामुळे जंगल बरंच नष्ट झालं आणि प्राणिमात्रही कमी झाले. म्हणून आज माणूस आणि प्राणी यांची अस्तित्वाची लढाई आपण पाहतो. एक दिवस मी शांतपणे माझ्या गावाबाहेर पडवीत झोपलो होतो. पडवीत गाई-म्हशी खाल्लेला चारा खाऊन रवंथ करीत होत्या . वर कारव्याच्या मांडणीवर चार-पाच शेळ्या बसल्या होत्या. खुराड्या मध्ये कोंबड्या होत्या. मी आतील लाकडी फळ्यांच्या माचोळीवर झोपलो होतो. अचानक, माझ्या स्वप्नात एक साप आला आणि मला इशारा करू लागला “आमच्यावर अत्याचार होतोय, तू आम्हाला मारायला उठलाय!” मी घाबरलो आणि ...