पोस्ट्स

लग्न जमण्याच्या पद्धती काल आणि आज लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लग्न जमण्याच्या पद्धती काल आणि आज

इमेज
पूर्वी मुलं-मुली बघायला जाणं सोडा साधा फोटोही पाहायला मिळायचा नाही. कारण त्यावेळेस सुविधा नव्हत्या. माझ्या आजोबाने सांगितलेली हकीगत. एकदा माझा आजोबा बोलला. ये तुक्या? तुझ्या पहिल्या मुलाचं म्हणजे भाग्याचं लग्न करायचय ना?  दोन-तीन वर्षांपूर्वी मी घोटवडीला गेलो होतो. तिथे गेलो तेव्हा तेथील माझा मित्र गंग्या पारधी बोलला.  हे कृष्णा.( कृष्णा म्हणजे माझा पंजोबा) अरे, तुझ्या भाग्याच्या पोराला पोरी बघतोय असं माझ्या कानावर आलंयं. हा बघतोय. त्याच्या जोडातली एखादी मिळाली तर. हाये का कुठे तुझ्या पाहण्यात.?  अरे मग कशाला इकडे तिकडे मुलगी बघतो?  माझ्या नातवाची पोर हाये ना. आताच तुला तिने पितळी मध्ये चहा आणून दिला नाही का. आणि खंदील तुझ्या बाजूला केला. ती पोरगी हाये बघ.  थोडी बारीक आहे पण दोन एक वर्षानी उपवर होईल.  आणि त्याच दिवशी लग्नाची बोलणे पक्के झाले.  घरी आल्यावर आजोबाने ही सर्व हाकिकत मामाला म्हणजे भाग्याला सांगितली. आणि अखेर पंजोबांनी घडवलेलं लग्न ना त्याच्या मुलाला ना नातवाला मोडवता आले. केवळ एका शब्दासाठी नातवाचं आणि मित्राच्या शब्दाला मान देऊन दुसऱ्या मित...