पळा रे सत्या तुक्या आला.
स्वतंत्र पूर्व काळात शेती, रानभाज्या, कंदमुळे, विविध हंगामातील झाडांची फळे हे उपजीविकेचे खऱ्या अर्थाने साधन होतं. त्याचबरोबर जोडधंदा म्हणून गावठी गायी, शेळ्या मेंढ्या, आणि कोंबड्या हा जोडधंदा म्हणून संसाराला हातभार लावत होता. त्यामुळे तेव्हा लोक खऱ्या अर्थाने सुखी होते. त्याच्यावरच अतिशय चांगली उपजीविका चालायची. माणसं आनंदी असायची निरोगी असायची माणसांची देवाण-घेवाण चालायची. धान्यरूपाने एकमेकांना मदत करायची. अन्याय विरोधात लढायची माझं लहानपण आजोळी गेलं. माझे आजोबा तुकाराम कृष्णा तळपे हे मावळ तालुक्यातील तळपेवाडीचे रहिवासी. त्यांच्याकडे बरीच जमीन होती. पण इकडून तिकडून आलेले गरीब माणसं तिथे स्थायिक झाली. माझ्या आजोबांनी त्यांना त्यांच्या मालकी जमिनीतील काही जमीन कसायला दिली ती कायमचीच. मी आजी आजोबाकडे वाढलो. त्यामुळे लहानपणापासूनच आजोबा बरोबर जंगलात फिरणं, शिकारीला जाणं, मोहोळ काढणे,आंबे, करवंद, टेंभ्र, तोरण, आळू, मोहाची फुलं आणि हिरडे जमा करण्याचं काम मी करत असे. कधी खेकडे धरायला तर कधी पागीर टाकण्यासाठी नदीवर तळ्यावर मासे पकडायला जाई. ते दिवस आठवल्या नंतर मन जुन्या आठवण...