पोस्ट्स

गोष्टी गावाकडच्या लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चला गावाकडे

इमेज
“अगं जानू, तुला मी सांगितलं होतं की आपण गावामध्ये आपल्या शेतीमध्ये राहून कष्ट करू, मिळेल त्यात समाधान मानू आणि आनंदाने जीवन जगू. पण तू माझं ऐकलं नाहीस.” जानकी म्हणाली, “तू मला लग्नाआधी काय सांगितलं होतंस? की तू मला शहरात ठेवशील. मी लहानपणापासून शहरात राहणारी आहे. त्यामुळे मी आता तुझ्यासोबत गावी राहणार नाही. तू जर गावाला जायचं म्हणत असशील, तर मी तुझ्यासोबत राहणार नाही.” जानकीचे हे शब्द ऐकून प्रभाकर  हवालदिल झाला. शेवटी तो आई-वडिलांना म्हणाला, “आई-बाबा, तुम्ही शेती सांभाळा. मी शहरात जाऊन एखादी छोटी-मोठी नोकरी करतो.” तो शहरात गेला. जानकीला शहरात राहण्याची सवय असल्यामुळे तीही त्याच्यासोबत राहायला गेली. पण शहरात नोकरी मिळत नव्हती. कसातरी त्याने एक छोटी खोली घेतली. वडिलांनी दिलेले पंधरा-वीस हजार रुपये आणि आणलेलं धान्य यावर त्यांनी काही दिवस काढले. शेवटी त्याला वॉचमनची नोकरी मिळाली—पगार १५ ते १६ हजार. खोलीचं भाडं ३-४ हजार. तो कामावर जाऊ लागला. इकडे जानकी घरी राहायची, पण हळूहळू ती मार्केटमध्ये फिरायला जाऊ लागली. तिला बाहेर फिरण्याची, हॉटेलमध्ये खाण्याची सवय होती. ओळखी वाढू लागल्या. तो घरी ...