माजला का रे…?
ग्रामीण भागातील आजही परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे की दैनंदिन आहारासाठी, मुलाबाळांच्या पोटासाठी सकाळी काम करायचे आणि संध्याकाळी खायचे हीच कडू वास्तवता आहे. विशेषतः पालघर, जव्हार, मोखाडा, नंदुरबार, धुळे, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर अशा आदिवासी व दुर्गम भागांत ही परिस्थिती आजही ठळकपणे दिसून येते. शासन म्हणते हे केलं, ते केलं; मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. गरीब माणूस आजही तसाच गुदमरून जगतो आहे, उपाशीपोटी राहत आहे. कितीतरी मुलं भूकबळी पडत आहेत. याची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे; पण राजकारणी, श्रीमंत वर्ग, करोडपती सिनेअभिनेते, धनिक व सत्ताधारी लोकांनी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे. त्यांना हे सर्व दिसत असूनही, “मरू दे तिकडे” अशीच मानसिकता त्यांनी स्वीकारली आहे. या गोरगरीबांना काहीतरी बोलायचे असते, पण ते बोलत नाहीत. त्यांचा आवाज, त्यांचे स्वातंत्र्य, त्यांचा स्वाभिमान या सगळ्यांचा फायदा उच्चवर्गीय व नोकरशाहीने दडपशाही करून घेतला आहे. कष्टकरी माणूस पहाटे उठतो, अर्धी चतकोर भाकरी कमरेला बांधतो आणि मिळेल ते काम करतो कधी...