पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेवटी आई ती आईच

इमेज
शेवटी आई ती आईच आहे त्या स्थितीमध्ये राहून, अनवाणी फिरून लेकरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, आई वणवण भटकत होती. चोचीत, झोळीत मिळेल ते अन्न घेऊन बछड्यांसाठी माघारी फिरत होती... शेवटी आई ती आईच आहे!! जेव्हा ती लहान होती, तेव्हा तिच्या आईबापांनी तिला परघरी दिली. डोळे पुसून सासरी गेली, सर्व विसरून राबू लागली. प्रेमाचा मिलाप झाला आणि माझा जन्म झाला. नऊ महिने, नऊ दिवस पोटी माझा सांभाळ केला. पोटातील काळजाला तिने वेदना होऊ नाही दिल्या... शेवटी आई ती आईच आहे!! पोटात असताना अंगाई गाई, भजन म्हणी; मी आतल्या आत गुणगुणत राही. दिवस भरल्याने तिच्या साक्षीने मी हे विश्व पाहिले... शेवटी आई ती आईच आहे!! मोठा होईपर्यंत माया, प्रेम देत होती, मार्ग दाखवत होती. समजदार झाल्यानंतर तिला विसरून जाई; आईबापांना उघड्यावर ठेवूनही तरीपण तिची माया माझ्यावरच राही... शेवटी आई ती आईच राही!! आई चिमणीही आहे, गाईही आहे आणि एक कष्टकरी बाईही आहे. कित्येक अशा आया आहेत, त्यांच्या सर्वांच्या पिल्लांवर माया आहेत. पिल्लांना सांभाळताना त्यांचं अख्खं आयुष्य जळून जाई... शेवटी आई ती आईच आहे!! लहानाचं मोठं केलं माय-बापाने, मुलासाठी सर्व...

शांत जगायचं असतं

इमेज
शांत जगायचं असतं असं नाही तसं नाही  बडबडायचं नसतं  असेल त्यात समाधान  राहून शांत जागायचं असतं!! त्यांनी हे केलं त्यांनी ते केलं त्याला ते मिळालं  असं जाळायचं नसतं  आपले जे आहे त्यात आनंदी राहायचं असतं शांत जगायचं असतं!! मनाचा हुंदका डोळ्यातील पाणी जागच्या जागीच दाबायचं असतं  कष्ट करून जे मिळेल  ते शिव करायचं असतं शांत जागायचं असतं नको लबाडी नको चोरी कोणाचे वरबाडायचं नसतं त्याच्या वेदना त्या आपल्याच वेदना समजून  जगायचं असतं शांत जगायचं असतं!! कशाची धावपळ कशासाठी धावपळ जे आहे ठाई ते मिळत राही पापाने भरलेला धनाचा घडा आज ना उद्या खाली होई  शांत जागायचं असतं!! सुदाम मदगे (किवळे अंदर मावळ पुणे)