पोस्ट्स

ग्रामीण व्यसनाधीनता ग्रामीण युवक समस्या लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ग्रामीण भागातील वाढती व्यसनाधीनता

इमेज
अगं सखु, आता या उघड्या रानात काही कमवायचं साधन उरलं नाही. पाणी नाही, पाऊस नाही. थोडीफार भात शेती आणि काही कडधान्य कसंतरी साठवून चार-पाच महिने पोट भरलं. आता घरात काहीच शिल्लक नाही. मी जिकडे मिळेल तिकडे काम करून येतो. एखादी भाकर असेल तर बांधून दे…” संत्या असं म्हणताच सखूने रिकामा पिठाचा आणि तांदळाचा डबा आपटला. “दोन दिवस झाले पोरांना पेज देऊन अर्ध्या पोटी ठेवतेय… ती उपाशी आहेत. तुला कसली भाकर देऊ?” हे ऐकून संत्या काही बोलला नाही. घोटभर पाणी पिऊन तो उपाशीपोटी कामाला निघून गेला… ही कथा केवळ संत्या-सखूची नाही, तर पूर्वीच्या ग्रामीण भारताची वास्तविकता आहे. त्या काळात अन्नधान्याची टंचाई होती. लोक जंगलातील कुरडयाची भाजी, उंबर, मोहाची फुलं आणि इतर वनफळांवर जगायचे. पडलं ते खायचं आणि नशिबाला दोष द्यायचा हेच आयुष्य होतं. एखादं कार्य किंवा सण आला कीच पोटभर जेवण मिळायचं बाकी दिवस कसेतरी ढकलायचे. काळ बदलला… पण समस्या बदलली का? गेल्या ५० वर्षांत परिस्थितीत मोठा बदल झाला. शिक्षण वाढलं, नोकऱ्या उपलब्ध झाल्या, गावागावात उद्योगधंदे सुरू झाले. पूर्वी जिथे दोन-तीन गावात एक गाडी असायची, तिथे आज प्रत्येक घरात ...