अमोल पालेकर सर्वसामान्यांचा हिरो
अमोल पालेकर. अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ रोजी मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पालेकरांच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. त्यांचे वडील पोस्ट ऑफिसमध्ये तर आई एका खासगी कंपनीत कामाला होती. पालेकर यांनी आपल्या कारकिर्दीला मुंबईतील प्रसिद्ध कॉलेज जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून कलाकार म्हणून सुरुवात केली. अमोल जेजे स्कूल ऑफ फाइन आर्ट्समध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांनी आपला खर्च भागवण्यासाठी टायपिंग शिकवले. पदवीनंतर अनेक ॲड एजन्सी मध्ये काम केले. त्यानंतर त्यांना बँकेत कारकूनाची नोकरी लागली, त्यामुळे दिवसा बँकेत काम आणि रात्री रंगकाम करायचे. मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा कलावंत ते संवेदनशील दिग्दर्शक असा अमोल पालेकर यांचा प्रवास आहे. सत्तरच्या दशकांत आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना रिझवले. सत्तरच्या दशकात एकीकडे अमिताभ बच्चन यांच्या रूपाने अँग्री यंग मॅन उभा रहात होता. त्याचवेळी देशात मध्यमवर्गही वेगाने वाढत होता. या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा नायक नव्हता. अमोल पालेकर यांनी ही गॅप भरून काढली. त्यांची...