पोस्ट्स

कष्टकरीजीवन शेतकरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

किंमत शून्य

इमेज
कष्टकरी शेतकऱ्याने उन्हातान्हामध्ये राबायचं आणि आपल्या अंगावरची कातडी जाळून, घामाच्या धारा वाहवत, कष्टाने शेतात काम करायचं. जमिनीची मशागत करायची, गुराढोरांना सांभाळायचं आणि शेतीतील विविधता, नैपुण्यपूर्णपणे फळं, अन्नधान्य, भाज्या आपल्याला द्यायच्या. हा शेतकरी, हा बळीराजा हाच खरा आपल्या देशाचा अन्नदाता. देशाचं पालनपोषण करणारा आणि खरा देशभक्त ठरणारा. भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. बरीचशी कृषी विषयक साधनं, विविध उत्पन्न आणि यंत्रसामग्री या ठिकाणी आली; परंतु ठराविक ठिकाणीच याचा वापर झाला. अगदी बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी प्रगत झाले, आणि बाकीचे दर्या-खोऱ्यात व अल्प साधनसामग्रीतून उत्पन्न घेणारे शेतकरी अजूनही हालहापेष्टांमध्ये आपलं जीवन जगत आहेत. सांगायचं तात्पर्य म्हणजे, शेती विषयक भरपूर योजना आल्या, कर्जमाफीच्या घोषणा झाल्या; परंतु या गरीब शेतकऱ्यांच्या हातामध्ये प्रत्यक्षात काहीच पडत नाही. शासनाने जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. मधले दलाल आणि काम करणारी माणसं हे सर्व काही गिळंकृत करत आहेत. अगदी चार-पाच महिने कष्ट करून शेतामध्ये राबायचं, आणि हाताच्या वेळी आलेलं पीक पाहून...