पोस्ट्स

अंधश्रद्धा बुवाबाजी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भोंदू

इमेज
उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू काय म्हणे त्यांचा थाट, अंगारा-बुकरा देऊन लावतात वाट। उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ भोंदू बाबा सर्वच नाही, त्यातील बरेच असतात चोर। दाढी-मिशा वाढून भोळ्या समाजाला बनवून होतात शिरजोर॥ मी असं करतो, मी तसं करतो, भूलथापा देऊन पीडित बसते। हाती काहीच नाही मिळालं, तर घर फोडतंय॥ उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ प्रथम तो गेला, नंतर दुसरा गेला, भोंदूने त्यांचा काढा काढला। मात्र बाई आल्याने हसून त्यांना जवळ केल्या॥ मी कृष्ण आहे, तू माझी राधा आहे, असं सांगून मोठ्या बाया फसल्या। उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ अहो साधुसंत येता घरा, तोच दिवाळी-दसरा। भोंदू येता घरा, त्याचा थाटच निराळा॥ उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ भोंदू बाबा कुंभमेळ्याला आले, सारे हवामान खराब करून गेले। उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ पैसा- धनदौलत सर्व काही देऊन भोंदूची सेवा करू, भोंदू पळून गेल्यावर एकमेकांची डोकी फोडू, उदंड झाले भोंदू चला तुरुंगात कोंडू॥ सुदाम मदगे, किवळे (मावळ) -