गुरुदत्त
हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले एक स्वप्न. लाभलेले वरदान. त्यांच्याशिवाय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. त्यांचे आयुष्य हे एका चित्रपटाचा विषय होऊ शकेल. आज ९ जुलै गुरुदत्त यांचा जन्मदिवस. आरपार, कागज के फूल, चौदहवी का चाँद, प्यासा, बाजी, साहिब बीबी और गुलाम, सी.आय.डी. असे काही नावाजलेले चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांचे चित्रपट त्यातला जिवंतपणामुळे ते कायम स्मरणात राहतील. गुरुदत्त यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात अबरार अल्वी यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या आयुष्यात खरे तर ते दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व जगले. आयुष्यात दोन स्त्रिया आल्या. दोन्ही त्यांच्या प्रेरणा होत्या. पत्नी गीता दत्त आणि अभिनेत्री वहिदा रहमान. गीता दत्त त्यांच्या पत्नी होत्या, तर सी. आय. डी. या चित्रपटापासून वहिदा रहमान त्यांच्या आयुष्यात आल्या. गुरुदत्त एक जागतिक पातळीवर निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतादेखील होता. त्यांना साहित्याची, संगीताची जाण पराकोटीची होती. पण, अभिनय ही त्यांची पहिली पसंती नव्हती तरीही त्याच्या सहज, संवेदनशील आणि नैसर्गिक अभिनयाचं गारुड रसिक प्रेक्षकांवर कायम ह...