पोस्ट्स

ग्रामीण जीवन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आंबे-करवंद घ्या

इमेज
पूर्वी अतिशय तुटपुंज्या मोबदल्यात मिळेल त्या जंगली साधनांचा आधार घेऊन माणसं आपला गुजराण करत असत. आम्ही आठवी-नववीत शिकत असताना, सुट्टीच्या काळात शेतीची कामं करायचो. कुणाच्या भाताची कापणी, कुणाचं गवत कापणं, तर कुणाकडे मजुरीचं काम किंवा भाजीपाला विकणे अशा प्रकारे थोडेफार पैसे जमा करून शाळेचा खर्च हलका करायचो. त्या वयात काहीच कळत नव्हतं. सुट्टी लागली की आम्ही मुलं विहिरीत, तळ्यात, नदीवर पोहायला जायचो. दिवसभर तिथेच खेकडे, मासे पकडायचे किंवा जंगलातील जे फळ मिळेल ते खायचो आणि थोडं घरी आणायचो. जंगलाने आम्हाला खूप काही दिलं सरपण गोळा करणे, विविध फळं जमा करणे, औषधी वनस्पती… हे सगळं म्हणजे निसर्गाचं आमच्यावर उपकारच. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आणि माझा मित्र बाळू जंगलात जाऊन कच्चे आंबे आणि करवंदे गोळा करायचो. सात-आठ किलो आंबे आणि तितकीच करवंदे गोळा करून शहरात विकायला जायचो. कधी प्रवासासाठी पैसे नसले तर तीन-तीन तास पायी चालत जायचो. काखेत आंब्यांची पिशवी, डोक्यावर करवंदांची टोपली, पाण्याची बाटली आणि आजीने दिलेली भाकरी घेऊन आम्ही रस्त्याला लागायचो. कधी तळेगाव, तर कधी कर्जतला जाऊन विक्री करायचो. एकदा तळ...

मायाजाळ – नात्यांमधील अहंकार आणि स्वार्थाची हृदयस्पर्शी कथा

इमेज
मित्रहो, माणूस माणसाच्या भल्यासाठी चांगल्या योजना आखतो आणि चांगल्या गोष्टी घडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. आर्थिक, सामाजिक आणि इतर सर्व बाबींचा आधार घेऊन तो आपल्या आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी झटत असतो. ही एका कुटुंबाची हकीगत आहे… एक चांगले कुटुंब होते. त्यांना एकुलता एक मुलगा शरद. शरद शिक्षण घेऊन मोठा झाला होता आणि एका चांगल्या खाजगी कंपनीमध्ये उच्च पदावर काम करत होता. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे आई-वडिलांची इच्छा होती की शरदसाठी सरकारी नोकरी असलेली मुलगी पाहावी. अखेर त्यांना सुषमा नावाची, शासन सेवेत उच्च पदावर काम करणारी मुलगी मिळाली. ती देखील एकुलती एक होती, आणि तिचे वडील नव्हते. शरद आणि सुषमा यांचे लग्न झाले आणि संसार सुरू झाला. परंतु शरद खाजगी नोकरीत आणि सुषमा सरकारी सेवेत असल्यामुळे, शिवाय वेगवेगळ्या जिल्ह्यांत तेही पंधरा-सोळा तासांच्या अंतरावर काम करत असल्यामुळे, त्यांना एकत्र राहणे शक्य होत नव्हते. शासनाच्या पती-पत्नी एकत्रिकरण धोरणाचा लाभही मिळू शकला नाही. सुषमाला शरदच्या आई-वडिलांसोबत राहणे मनापासून पटत नव्हते, पण ती मनातील नाराजी दाबून ठेवत होती. नवीन संसार असल्यामुळ...