माजलेले भिकारी – एक कटू वास्तव
पोटापाण्यासाठी माणसं काय काय करतात… कोणी नोकरी करतं, कोणी शेती करतात, कोणी वेगळा व्यवसाय करतात. काबाड कष्ट करणारी माणसं मजदूर, कामकरी मिळेल ते काम करून मात्र इज्जतीने आपलं दैनंदिन जीवन पार पडतात. मुलांचे शिक्षण, आरोग्य, घरदार हे कसं व्यवस्थित चालेल, याच विचारात असतात. प्रामाणिक कष्ट करणारा जो वर्ग आहे, त्यांना जे मिळेल त्यामध्ये समाधान असतं. चोरी-लबाडी करत नाहीत. नेहमी खऱ्याची बाजू धरून वागतात. हेही जितकेच खरे आहे… अशा लोकांना जास्त दुःख असतं; मात्र दुःख शोषूनही सुखासाठी कधी चुकीची कामं करत नाहीत. अशी माणसं देवाला प्रिय असतात. पण आता अशी माणसं मिळणं दुर्मिळ झालं आहे. कोणी राजकीय फायदा घेतो, कोणी योजना लुबाडतो, कोणी मिळेल तेथे हात मारतो, तर कोणी गरीबांची जमीन फसवून काही आमिष दाखवून लुबाडतो आणि त्यांना भूमिहीन करतो. अशा लोकांची आता ज्यादा चलती आहे. पण इतकंही खरं आहे की त्यांचं ते सुख तात्पुरतं… कायम दुःख त्यांना सहन करावं लागतं, हे नाकारता येत नाही. हकीकत अशी आहे की जेवढं काही कष्ट न करता मिळेल, फुकट फायदा मिळेल, तिकडे लोकांची गर्दी वाढली आहे. आता हेच लोक वेगवेगळ्य...