माजलेले भिकारी – एक कटू वास्तव
पोटापाण्यासाठी माणसं काय काय करतात…
कोणी नोकरी करतं, कोणी शेती करतात, कोणी वेगळा व्यवसाय करतात. काबाड कष्ट करणारी माणसं मजदूर, कामकरी मिळेल ते काम करून मात्र इज्जतीने आपलं दैनंदिन जीवन पार पडतात. मुलांचे शिक्षण, आरोग्य, घरदार हे कसं व्यवस्थित चालेल, याच विचारात असतात.
प्रामाणिक कष्ट करणारा जो वर्ग आहे, त्यांना जे मिळेल त्यामध्ये समाधान असतं. चोरी-लबाडी करत नाहीत. नेहमी खऱ्याची बाजू धरून वागतात.
हेही जितकेच खरे आहे… अशा लोकांना जास्त दुःख असतं; मात्र दुःख शोषूनही सुखासाठी कधी चुकीची कामं करत नाहीत. अशी माणसं देवाला प्रिय असतात.
पण आता अशी माणसं मिळणं दुर्मिळ झालं आहे. कोणी राजकीय फायदा घेतो, कोणी योजना लुबाडतो, कोणी मिळेल तेथे हात मारतो, तर कोणी गरीबांची जमीन फसवून काही आमिष दाखवून लुबाडतो आणि त्यांना भूमिहीन करतो.
अशा लोकांची आता ज्यादा चलती आहे. पण इतकंही खरं आहे की त्यांचं ते सुख तात्पुरतं… कायम दुःख त्यांना सहन करावं लागतं, हे नाकारता येत नाही.
हकीकत अशी आहे की जेवढं काही कष्ट न करता मिळेल, फुकट फायदा मिळेल, तिकडे लोकांची गर्दी वाढली आहे.
आता हेच लोक वेगवेगळ्या रूपात नाटकं करून, लहान मुलांना पळवून, अनेक प्रकारची फसवणूक करून भीक मागायचा धंदा मोठा करत आहेत.
एकदा एक माणूस भेटला म्हणाला, “माझ्या बायकोने जाळून घेतले, तिला दवाखान्यात घेऊन जायचे, मला मदत करा.”
दुसरा प्रसंग चांगली कपडे घातलेले जोडपे भेटले त्यांच्याकडे एक लहान मुलं होते. म्हणे,
“आमची बॅग चोरली, आम्हाला अमुक गावाला जायचे आहे, पैसे नाहीत.”
मी त्यांना म्हटलं,
“चला, मी तुम्हाला एसटी डेपोला घेऊन जातो, तिकीट काढून बसवून देतो.”
तर ती बाई लगेच पुढचा रस्ता धरून निघून गेली!
लहान मुलं, तंदुरुस्त बाया, धष्टपुष्ट माणसं कोणतीही लाज न बाळगता गाड्यांमध्ये, स्टेशनवर, ट्राफिक चौकात सर्रास भीक मागतात.
एकदा एक बाई माझ्यासमोर भिक मागत होती. यापूर्वी तिची एका माणसाशी बाचाबाची झाली होती. मी आपुलकीने विचारलं, “काय झालं, ताई?”
तर ती म्हणाली,
त्या माणसाकडे 20 रुपये मागितले मुलाला वडापावसाठी, आणि त्यांने दिले नाहीत म्हणून मी ओरडले.
मी म्हटलं,
अहो ताई, 20 रुपये म्हणजे कमी आहेत का? तुम्ही चांगले आहात, काम करा. मुलांवर हे संस्कार चांगले नाहीत.
यावर ती मोठ्या आवाजात म्हणाली,
तुही भिकारीच भेटलास!
ते शब्द ऐकून मी गप्प पुढे गेलो… आणि मनात म्हटलं
बापरे, किती दादागिरी!
काही जण डॉक्टरांच्या पट्ट्या हाता पायाला किंवा डोक्याला बांधून घेऊन, अपंग असल्याचे दाखवून, बोबडे असल्याचे नाटक करून पैसे मागतात. प्रत्यक्षात त्यांना काहीच झालेलं नसतं. असे अनेक प्रसंग दिसतात.
एकदा कामावरून उशिरा आलो. दुपारचा डबा राहिला होता. भाजी खराब होण्याच्या मार्गावर होती. एक बाई पोराला मांडीवर घेऊन बसली होती. वाटलं, तिला चपात्या देऊ. मी दिल्या.
पण पुढे चार पावलं गेलो तर ती उठली आणि माझ्याच चपात्या स्टेशनच्या पत्र्यावर फेकून दिल्या!
मी रोखलं तिला “का टाकल्या?”
माझं रूप पाहून ती धडधडीत उठली आणि दुसरीकडे निघून गेली. मी मनातच म्हटलं, “एखाद्या गाय- किंवा कुत्र्याला दिल्या असत्या तर बरं झालं असतं.”
अशी लोकं जागा बदलत राहतात — पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता… सर्वत्र अशी टोळी दिसते.
मध्यंतरी वाचण्यात आलं — इंदूर शहरात भिकाऱ्याला भीक देणं हा गुन्हा ठरवला आहे. खरंच, आज कष्ट न करणारी संख्या वाढली आहे.
दिवसाला हजार-पाचशे कमवतात आणि संध्याकाळी मस्त खाणं-पिणं करतात. त्यांना कशाचीच चिंता नाही. मुंबईतील काही भिकारी तर कोट्यधीश निघाले, बँकेत लाखो-करोडोची बॅलन्स!
कष्ट करणारे मात्र कष्ट करून मरत आहेत; सुखाचं जीवन त्यांना मिळत नाही.
आणि हे आईतखाऊ लोक एन्जॉय करत जगतात. हे गांभीर्याने आपण विचारात घ्यायला हवं.
खरोखर ज्याला गरज आहे त्यालाच मदत करायला हवी. त्यातूनच समाजहित जोपासलं जाईल.
नाहीतर अशा प्रवृत्तीमुळे गावोगावी भिकार्यांची संख्या वाढत राहील.
आणि ही लोकं घर-लुबाडायला कमी करणार नाहीत. त्यांची टोळी असते कोणी मनकवडी, तर कोणी देवऋषी म्हणून येतं आणि याच्यातून अनेक गुन्हे होतात.
म्हणून आपण सावध राहणं अत्यावश्यक आहे.
हाच एक संदेश देऊ इच्छितो.
धन्यवाद
आपला,
सुदाम मदगे (किवळे,अंदर मावळ)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा