ॲक्शन आणि म्युझिकल फिल्म मोहरा

१ जुलै १९९४ ला मोहरा रिलीज झाला होता.

तू चीज बडी है मस्त मस्त ह्या गाण्याने त्या काळात धुमाकूळ घातला होता. रिक्षा, रसवंती गृह, कटिंग सलून आणि घरोघरी हेच गाणं लूप वर वाजत होतं. 

ना कजरे की धार, 

सुबह से लेकर शाम तक.. मुझे प्यार करो, आणि एक स्पेशल गाणं, जे आम्हाला तेव्हा चोरून बघावं लागायचं.( ते टिव्ही वर लागलं की चॅनल बदललं जायचं किंवा VCR वर पाहत असल्यास फास्ट फॉरवर्ड केलं जायचं. ) ते आयकॉनिक गाणं " टीप टीप बरसा पानी" 

एकंदर सगळीच गाणी जबरदस्त असल्यामुळे त्याची ऑडिओ कॅसेट खूप खपली. 

राजीव राय ह्या गुणी दिग्दर्शकाने आणि त्रिमूर्ती फिल्म्स ह्या त्याच्या प्रॉडक्शन हाऊस ने विश्वात्मा , त्रिदेव, गुप्त, यांसारखे क्लासिक सिनेमे दिले आहेत. विजू शाह ह्या त्याच्या आवडत्या म्युझिक दिग्दर्शकाने ह्या सगळ्याच सिनेमात अजरामर गाणी आणि संगीत दिलेलं आहे. 

मोहरा हा एक कमालीचा भारी ॲक्शन ड्रामा आहे. त्या काळात सगळे अभिनेते एकमेकांबरोबर गुण्या गोविंदाने नांदायचे ( गोविंदा सुद्धा ) त्यामुळे अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ही प्रेक्षकांची अतिशय आवडती जोडी घेऊन मोहरा काढण्यात आला तेव्हा त्यातली ॲक्टिंग, ॲक्शन, नसीरुद्दीन शाह चं व्हीलन असणं, जिब्रान, टायसन, इत्यादी गँग वाली खलनायक मंडळी, हे सगळं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

त्या काळात फक्त ३.७५ कोटीत बनलेल्या ह्या चित्रपटाने एकूण २२.६५ कोटींचा धंदा केला. ( त्या काळात आजच्यासारखे खोटे आकडे आणि भरमसाठ तिकिटांचे रेट नव्हते ) तरीही आजच्या महागाईच्या हिशोबाने मोहराने जवळपास १५० कोटी कमवले असे म्हणता येईल. 

हा चित्रपट खऱ्या अर्थाने सुनील शेट्टीच्या करियर मधला महत्त्वाचा चित्रपट आहे.बहिणीवर बलात्कार केलेल्या गुंडांना यमसदनी पाठवून स्वखुशीने जेल मध्ये जाऊन शिक्षा भोगणारा विशाल अग्निहोत्री ( सुनील शेट्टी ) जेव्हा तिथल्या जेलरच्या मुलीला (रविना टंडन ) ला जेल मधल्या गुंडांपासून वाचवतो तेव्हा रविना त्याची शिक्षा कमी करून त्याला जेल मधून बाहेर काढते.आणि आंधळा पत्रकार नसीरुद्दीन शाह त्याच्यातली आग ओळखून त्याला शहरातल्या सगळ्या मोठ्या गुंड आणि डॉन लोकांच्या माणसांना एकेक करून मारायचं मिशन देतो,

शहरात ड्रग, हत्यारं, पुरवून समाज खराब करणाऱ्या माणसांना मारून चांगलं काम करतोय अशी विशालची समजूत असते. 

पण जेव्हा नसीरुद्दीन शाह त्याला शहराच्या पोलिस कमिशनर ला मारायला सांगतो तेव्हा मात्र विशाल अग्निहोत्री ला संशय येतो आणि तो त्याला न मारता परत येतो. 

तिथे मात्र विशाल ला कळतं की नसीरुद्दीन शाह आंधळा नाहीये आणि तो प्रत्यक्षात त्याचं प्यादं म्हणून वापर करून स्वतः चे प्रतिस्पर्धी संपवत होता. 

नंतर मग समज, गैरसमज, कबुली, उलगडा, आणि रीतसर क्लायमॅक्स फाईट सीन ( सुनील शेट्टी शेवटी मरतो हे काही आवडलं नव्हतं ) ही स्टोरी त्या काळात खूपच आवडली होती, 

आणि त्यामुळेच आजही हा सिनेमा माझ्या आवडत्या ९०'s च्या चित्रपटांमध्ये टॉप १० लिस्ट मध्ये आहे . 

हा सिनेमा Death Wish 4 : The Crackdown ह्या अमेरिकन ॲक्शन थ्रिलर चित्रपटावरून इंस्पायर्ड आहे असं म्हणतात. याचा क्लायमॅक्स मात्र हाँग काँगच्या Hard Boiled नावाच्या चित्रपटावरून प्रेरित होऊन केला होता म्हणतात ) 

यातले काही सीन मात्र केवळ अविस्मरणीय आहेत. उदाहरणार्थ सगळे फाईट सीन. सुनील शेट्टी दिसल्यावर जे background music वाजतं, ते आजही मला प्रचंड आवडतं आणि माझ्या प्ले लिस्ट मध्ये आहे. अर्थात चित्रपटात त्यातला एक पीस वापरला आहे , पण ते पूर्ण गाणं यूट्यूब वर आहे " Depache Mode : I feel you ( Babylon Mix ) या नावाचं.

त्यातला ड्रग फॅक्टरी शूटाउट सीन हा माझ्या अत्यंत आवडीच्या सीन पैकी एक आहे. जिथे सुनील शेट्टी दोन handgun घेऊन ड्रग लॅबची नासधूस करतो आणि शेवटी बॉम्बने उडवतो . असले सीन त्या काळात रेअर होते. 

अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांची एकमेकांसोबत असलेली फाईट सीन पण अशीच जबरदस्त.

एकंदर हा सिनेमा एक क्लासिक ॲक्शन ड्रामा होता आणि खूपच कमाल होता. गाणी, ॲक्शन, रोमान्स, अभिनय, कॉमेडी ( परेश रावल आणि हरीश पटेल ) असा कंप्लीट एंटरटेनर. म्हणूनच मला तेव्हाचे चित्रपट अजूनही आवडतात. आताचा बॉलिवूड ने केलेला कचरा पाहता ३० वर्षांपूर्वीचे चित्रपट कधीही बेस्ट..!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था