पोस्ट्स

अखेर काय? माणूस, सत्ता, संपत्ती आणि निसर्गाचा समतोल

इमेज
अखेर काय? माणसाच्या इच्छा-आकांक्षा इतक्या वाढल्या की त्या कधीच संपल्या नाहीत. अपेक्षा वाढत गेल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी माणूस कोणत्याही स्तराला जाऊ लागला. नातेसंबंध तुटले, माणुसकी हरवली, प्राणी-पक्ष्यांवरचे प्रेम कमी झाले. आर्थिक, सामाजिक व राजकीय गरजा वाढत गेल्या आणि त्या गरजांच्या पूर्ततेसाठी माणसाने सामाजिक समतोल बिघडवला. सर्व काही असूनही मान-अपमान, तुलना आणि स्पर्धा वाढत गेली. निसर्गावरचा अन्याय माणसाने जंगल उद्ध्वस्त केली, प्राण्यांचे अधिवास नष्ट केले. त्यांना उघड्यावर, डोंगरकपारीत व बिळांमध्ये राहण्यास भाग पाडले. सावली नाही, पाणी नाही, सुरक्षितता नाही—असा असमतोल निर्माण झाला. आपण किती नुकसान करत आहोत, किती जाळपोळ करत आहोत, हे भानच माणसाला राहिले नाही. परिणामी निसर्ग आणि प्राणीमित्रांचा रोष आपल्यावर कोसळू लागला आणि नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले. वाढती विषमता गरीब गरीबच राहिला, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेला. राजकारणाचा विचार करायचा तर घराणेशाही, वाढलेल्या अपेक्षा आणि राजेशाही जीवनशैली यामुळे सामान्य माणूस फसवला गेला. वेळप्रसंगी गोड बोलून लोकांचा वापर करून घेतला गेला—ह...

अजितदादा सलाम तुमच्या कार्याला

इमेज
हे काय घडतंय, कळेनासं झालं आहे. अपेक्षित असं काहीच घडत नाही. मनाची अवस्था समजत नाही आणि ती कुणापर्यंत पोहोचवावी हेही उमगत नाही. माणसं गोड असतात, नाती सुंदर असतात; पण त्या नात्यांनाही एक मर्यादा असते. इच्छा-आकांक्षा असतात, स्वप्नं असतात, पण भगवंताने आखून दिलेल्या रेषा मर्यादित असतात. त्या मर्यादेच्या पलीकडे गेलं की अपमान पदरी पडतो, आणि शेवटी उरतो तो फक्त पश्चाताप. उगाच इकडे-तिकडे ओढाताण करत राहतो आपण. मर्यादा ओलांडल्यानंतर हातात काहीच राहत नाही. आबा आर. आर. नंतर तुमच्याशी ओढ निर्माण झाली. तुम्ही एकदा आमच्याकडे आलात आणि आम्ही सगळं विसरून तुमच्या प्रेमात पडलो. आमचं प्रेम तुम्ही स्वीकारलं की नाही हे आम्हाला कधीच कळलं नाही; पण आम्ही मात्र वेडेपिसे झालो. काही मिळेल की नाही याची पर्वा न करता, आम्ही तुमच्या मागे लागलो. ते प्रेम होतं… निखळ, निष्काम. पण आमच्या प्रेमाला साथ मिळण्याआधीच सगळं संपलं. तरीसुद्धा आम्ही तुमच्यापासून दूर गेलो नाही. कधी भेट होईल, कधी मुलाखत होईल, कधी फक्त दर्शन मिळेल याची चिंता कधीच केली नाही. फक्त तुम्हाला पाहून आम्ही कायम आनंदी राहत होतो. तुम्ही खूप दिलंत. कुणाचं भलं के...

तेवढा तरी लेकराला जमिनीचा तुकडा राहू द्या.

इमेज
पूर्वी वानर होती आणि वानरासारखीच काही माणसे होती, म्हणून त्यांना आदिमानव असे संबोधले जाई.  रामायणकाळात भगवान श्रीरामाच्या वनवासाचे वर्णन येते. त्या काळात भिल्ल, पारधी, कोळी तसेच डोंगर-दऱ्या व जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाने श्रीरामांना मोलाची मदत केली.  म्हणूनच रावणानेही श्रीरामांना वनवासी असे संबोधले होते. हे वनवासी म्हणजेच जल, जमीन आणि जंगल या संपत्तीचे खरे मालक म्हणजेच मूळ आदिवासी समाज. भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक तसेच महिला क्रांतिकारकांनी आदिवासींच्या जमिनी व पिकांच्या संरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळे जागरूकता निर्माण झाली आणि “जिथे कुळ तिथे जमीन” या तत्त्वावर आदिवासी समाज जमिनीचा मालक ठरला. परंतु कालांतराने आधुनिक विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बदल घडले. धरणे बांधली गेली, जलसाठे निर्माण झाले, रस्ते झाले, जंगलतोड झाली.  या सर्व तथाकथित विकासात सर्वाधिक भरडला गेला तो आदिवासी समाज. तुटपुंजा मोबदला देऊन त्यांना पुन्हा डोंगरदऱ्यांत हुसकावून लावण्यात आले आणि काबाडकष्ट करण्यास भाग पाडले गेले....

आत्महत्येची हत्या

इमेज
आज आपण जिकडे तिकडे पाहतो तिकडे प्रचंड स्पर्धा दिसते. माणसाच्या गरजा कधीच कमी झाल्या नाहीत; उलट त्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.  पक्षी, प्राणी आपल्या गरजांपुरते जगतात; परंतु माणूस मात्र अमर्याद गरजांच्या जाळ्यात अडकत चालला आहे.  या वाढत्या गरजांमुळे त्याची मानसिकता ढासळत आहे. पैशाची ओढ वाढली आहे, पण समाधान, स्थैर्य आणि खरे सुख हरवले आहे. माणूस सतत पैशाच्याच मागे धावताना दिसतो. “यांनी हे मिळवलं, त्यांनी ते साध्य केलं, तो पुढे गेला आणि मी मागे का?” या तुलनात्मक विचारांनी माणूस आतून पोखरला जात आहे. सर्व काही असूनही तो असमाधानी आहे.  हीच असमाधानाची भूक माणसाला कुठल्या टोकाला नेऊन ठेवते, हे आपण आज समाजात पाहत आहोत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये अजूनही एका वेळच्या अन्नासाठी काही लोक तडफडत आहेत.  अनेक दुर्गम भागांत भूकबळी जाणं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. याची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली असून केंद्र शासनावर ताशेरे ओढले आहेत. असाच एक माणूस प्रचंड आशावादी, काहीतरी मोठं करायची जिद्द असलेला — व्यवसायात उतरतो. पण नशिबाची साथ मिळत नाही.  धंद्यात तोटा होतो, पुढे ज...

बदलत्या काळातील समाज, शिक्षण आणि नातेसंबंध

इमेज
आजचा काळ हा झपाट्याने बदलणारा काळ आहे. वैज्ञानिक, तांत्रिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात बदल झालेले आपण अनुभवत आहोत.  पूर्वी शिक्षणाची साधने मर्यादित होती. आधुनिक तांत्रिक यंत्रणा, दळणवळणाची साधने किंवा कम्युनिकेशनची माध्यमे जवळजवळ नव्हतीच.  एखादा रेडिओ किंवा क्वचित टीव्ही एवढीच साधने होती, तीही आता कालबाह्य ठरली आहेत. आज टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली असून रेडिओ जवळजवळ इतिहासजमा झाला आहे. पिढ्यानपिढ्यांमध्ये झालेला बदल स्पष्टपणे दिसून येतो. चालीरीती, संस्कृती, राहणीमान, आचार-विचार यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले आहे.  आज योग्य दिशा व मार्गदर्शन, वाढलेली साधनसामग्री, बदललेली आर्थिक परिस्थिती आणि शासनाच्या विविध योजनांचा मोठा फायदा समाजाला झाला आहे.  यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती लक्षणीय झाली. मोठमोठ्या शिक्षणसंस्था, उच्च शिक्षणाच्या डिग्र्या उपलब्ध झाल्या. आज कोणी डॉक्टर झाले, कोणी अभियंते, कोणी एम.फिल., पीएच.डी. केली, तर कोणी आयटी क्षेत्रात नाव कमावले. काही प्राध्यापक झाले, काही पोलीस अधिकारी, तर काही शासकीय अधिकारी व कर्म...

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

इमेज
माझं लहानपण आजोळी गेलं. घरची परिस्थिती बेताची होती. गावातील सर्वच मुलांवर त्या काळी लहान वयातच कामाचा बोजा पडायचा.  गवत काढणी, भात कापणी, गुरे-ढोरे,सांभाळने, गवत कापून आणने ही सगळी कामं आमच्यासाठी रोजचीच होती.  या कामांतूनच उपजीविकेचा थोडाफार आधार मिळायचा. शाळेला जायचं तेव्हा तिथेच खाणंपिण मिळायचं. आश्रमशाळा होत्या, म्हणून दुर्गम ग्रामीण भागातील आम्हा मुलांना शिक्षणाची संधी मिळाली.  सुट्टी लागली की पुन्हा गावाकडे येऊन कामाला लागायचं. त्या शाळा नसत्या तर ग्रामीण भागातील अनेक मुलं शिकलीच नसती.  आजही इतके दुर्गम भाग आहेत की पावसाचे चार महिने माणसाला बाहेर पडता येत नाही; तेव्हा जे मिळेल ते खाऊन दिवस काढावे लागायचे. माझ्या मामाच्या गावातील तळपेवाडीतील आमच्यासोबत शिकलेली अनेक मुलं पुढे मोठ्या नोकऱ्यांमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये स्थिरावली.  लक्ष्मण दळवी, बाळू बुरसे, शांताराम वाजे, दत्तू दगडे, दत्तू तळपे, अनंता काठे, संभाजी अशी अनेक नावं आजही अभिमानाने घेतली जातात. तळपेवाडीचा मावळ परिसरात नावलौकिक आहे. तळपेवाडीचा मावळ तालुक्यात अजूनही दबदबा आहे. तरुण मंडळ, आणि पैलवान यांन...

जिवंत असूनही मेलेल्या अवस्थेत आई-वडील | सामाजिक वास्तवावर हृदयस्पर्शी लेख

इमेज
आपणास ज्ञात आहे की मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथांनी गुरुदक्षिणेसाठी वडिलांसाठी डोळा काढून दिला.  आई-वडिलांची अपार सेवा करणाऱ्या श्रावणबाळाची कथा सर्वश्रुत आहे.  भक्त प्रल्हादासाठी भगवानांनी नरसिंह अवतार धारण केला, हे भक्तीचे सर्वोच्च उदाहरण आहे. भगवान श्रीरामांची भक्ती करणारी भिल्ल स्त्री शबरी उष्टे बोर अर्पण करते आणि राम ती भक्ती म्हणून स्वीकारतात—ही केवढी मोठी श्रद्धा! रामाच्या वनवासात खरा वनवास कोणाचा झाला असेल, तर तो लक्ष्मणाचा झाला. भावावरील माया, श्रद्धा, भक्ती व सेवा यांची ही सर्व उदाहरणे आहेत. कथेमध्ये कधी कधी अशा उदाहरणांची आवश्यकता असते—एवढाच हा भाग. खरी हकीगत अशी आहे— जुन्या काळात, आमच्या गावातील दशरथला बऱ्याच वर्षांनी मूल झाले. नशीब फळाला आले होते. एक वर्षाने दोन मुलगे झाले. मग काय—दसऱ्याचा आनंद द्विगुणित झाला. गावासाठी जे करायचे, जे नको तेही त्यांनी केले. दशरथला त्यांच्या घरात कधीच “काय आहे?” असे कोणी पाहिले नाही—फक्त आनंद, उत्साह आणि आपुलकी होती. मुलांच्या जन्मामुळे त्यांचे आयुष्य सुखात गेले. मुलं मोठी झाली, समजदार झाली. त्या काळी फारसे शिक्षण नव्हते. मोठा मु...