पोस्ट्स

असं आहे का राजकारण?

इमेज
असं आहे का राजकारण? अख्खा समाज बोलतोय, वाड्या-पाड्यांमध्ये दरी निर्माण करतोय, भावकीमध्ये भांडण लावतोय, तंटामुक्ती करण्याऐवजी तेढ निर्माण करतोय — असं काय आहे राजकारण? कोण कुणाचा भाऊ पळवतोय, तर घरातील माणसं फोडतोय, अखी समाज व्यवस्था विस्कळीत करतोय  असं आहे का राजकारण? एका गावात अनेक पक्ष, एकमेकांची डोकी फोडतोय, समाजाचं हित सोडून स्वार्थासाठी भांडतोय. समोर येता गोड बोलतोय, मागं मात्र वैरी होतोय. कोण कोणाला मारतोय, निवडून आल्यानंतर जो-तो बाजूला होतोय. पडलेला राजकारणी दुसऱ्याचा बदला घेतोय, आणि एखादा तिसरा निवडणुकीत पडला म्हणून दिलेले पैसे परत मागतोय — असं आहे का राजकारण? पूर्वी पाटील बोलायचा ते घडायचं, आता गटातटामुळे भलतंच घडतंय. त्यामुळे समाज प्रगतीपासून दूर ढकलतोय. कधी इकडं, कधी तिकडे, स्थिर नाही. पक्ष समाजाचा फायदा घेऊन आपलं पोट भरतोय — असं आहे का राजकारण? हे करतो, ते करतो असं म्हणत सुटतोय, पण निवडून आल्यानंतर काहीच नाही करतय. महिना-दीड महिना दारोदार फिरतोय, तरुणांना फितवतोय, त्यांना सर्वकाही देतोय, आणि त्यामध्येच आम्ही गार होतोय — असं आहे का राजकारण? ना रस्ता, ना शिक्षण, ना आरोग्य —...

मंदिरातला देव माणूस

इमेज
साधारण चाळीस वर्षांपूर्वीचा तो काळ असावा. तेव्हा रोजगार म्हणजे सकाळी उठून गवत कापणे, काट्यावर नेणे, जंगलातून लाकडाच्या फाट्या आणून विकणे—त्यातून मिळणारी तुटपुंजी रक्कमच घर चालवायची.माझा एक मित्र ही हकीगत सांगत होता.  त्याला मी म्हणालो, “आमचंही काही वेगळं नव्हतं. रोजगार नव्हता, शेतात मिळेल ते काम करायचं.” ते दिवस होते आमच्या दहावीच्या वर्गाचे. शाळा संपल्यावर झाडाखाली पोत अंथरून बसायचो आणि मन लावून अभ्यास करायचो. मुलांमध्ये अभ्यासाची चढाओढ होती. जसजसं वर्ष पुढे सरकत गेलं, तसतसा अभ्यासाचा ताण वाढत गेला. दहावीचं वर्ष असल्यामुळे आम्ही गावातील मारुतीच्या मंदिरात कंदील किंवा रॉकेलची बत्ती लावून रात्री-रात्री जागून अभ्यास करायचो. परीक्षा आली, आम्ही परीक्षा दिली. परीक्षा चांगली गेली होती. इंग्रजी थोडी कच्ची होती, पण त्यासाठीही मेहनत घेतली होती. दहावी पास होणार याची खात्री वाटू लागली आणि पुढील शिक्षणासाठी कागदपत्रांची लगबग सुरू झाली—जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला. ही कागदपत्रे गावात किंवा ग्रामपंचायतीत मिळत नव्हती. गावात फारसे शिकलेले लोक नव्हते. तालुका म्हणजे काय, कुठे जायचं—हेही अनेकांना म...

खापर-खापर पंजोबा यांचं गावाबाहेर पडलेलं मोडकं घर

इमेज
एक सामूहिक आत्मचिंतन आणि आवाहन नमस्कार गावकरी मंडळी, पूर्वी आपली गावं वाड्या-वस्त्या दर्‍या-खोऱ्यांमध्ये वसलेली होती. जंगल, धनसंपदा, गुरं-ढोरं, धान्य, दूध-दही-ताक—सर्व काही मुबलक होतं. लोकांना फारसं दवाखान्याचं नावही घ्यावं लागत नव्हतं. जंगल, हवा, पाणी आणि तेथील औषधी वनस्पती यांवरच जीवन चालायचं. लोक फार शिकलेले नसले, तरी चावडीवर बसायचे, अंगणात शेकोटी पेटवायचे, आकाशालाच घर मानून झोपायचे. एकमेकांची विचारपूस, जत्रा-कात्रा, सुख-दुःखाला एकत्र जमणं—या सगळ्यातून जीवनाचा खरा आनंद घेतला जायचा. माणसं गरीब होती, पण मनाने फार मोठी होती. माणुसकी, प्रेम, जिव्हाळा, बंधुत्व आणि आदर यांची श्रीमंती होती. काळ बदलला. संपर्काची साधनं वेगवान झाली. तांत्रिक यंत्रणा वाढली. दोन सेकंदांत देश-विदेशात संवाद होऊ लागला. मुलं शिकली, मोठी झाली, मोठ्या पदावर पोहोचली. घरी गाड्या-घोड्या उभ्या राहिल्या. माणसाची प्रगती झाली—यात शंका नाही. आपल्या माणसाची प्रगती व्हावी, ही सात्विक भावना आपण कायम ठेवायलाच हवी. परंतु सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील दर्‍या-खोऱ्यात वसलेली आपली अनेक गावं धरणांमुळे विस्थापित झाली. गावं-वाड्या माळावर...

जंगली जीवन

इमेज
जंगली जीवन अहो साहेब, आम्ही इथं पडलेल्या खोपटात, उघड्या पथरावर कायमच उलट–पालट पडायचं काय? या पोटाची खळगी भरायला करायचं तरी काय? इथं नाही कसलंच काही हातात, नाही दमडी माय, म्हणून काहीच सुचत नाही. सकाळीच उठून शिकारी जाई, उंदरांनी पळवलेलं शेतीतलं धान्य आम्ही खोदून खाई. अहो साहेब, इथं कशाचं काय करायचं काय? आम्हाला कशाची वस्त्र? म्हातारा नव्वदी पार झाला, तरी तो लोंगटीवरच राही. मूलबाळ उघडी, काहीच नाही अंगावर. अहो साहेब, इथं कशाचं काय हानी करायचं काय? म्हणे सरकारनं काहीतरी दिलं, ते साहेबांच्या पोटात गेलं. कागदावर अंगठा गेला, मिळालं तर काहीच नाही. अहो साहेब, इथं कशास काय करायचं काय? मुलाबाळांना शिक्षण नाही, ते सकाळीच फासा–भिंगरी घेऊन जंगली जाई. जे काही मिळेल ते भाजून खाई. अहो साहेब, इथं कशाचं काय करायचं काय? मुलीला दिवस गेलं, तिच्या पोटात उठलं, म्हणून दूरकोशात झोळीत घालून दवाखान्यात नेलं. पण मधेच तिचं सर्व काही गेलं. अहो साहेब, इथं कशास काय आणि करायचं काय? म्हणे स्वातंत्र्य मिळालं, पण आम्हाला काहीच नाही मिळालं. मतासाठी आम्हाला फसवलं, राब–राब राबवलं. डोळ्यात अश्रू, पोटाला चिमटा देऊन तुमच्या दारा...

अनाडी सरपंच

इमेज
पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले. निवडणूक आयोगाच्या अभ्यास समितीने त्या-त्या परिसराची भौगोलिक स्थिती, जातींचा वर्ग, तेथील राहणीमान यांचा सखोल अभ्यास करून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य पदांसाठी जातीनिहाय जागा जाहीर केल्या. आमच्या गावामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असल्याने, त्या ठिकाणी महिला गटासाठी ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समिती सरपंच पद आरक्षित झाले. अनुसूचित जमातीतील, डोंगर-दऱ्यात राहणारी, शेतीवाडी करणारी, लाकूड-गवत गोळा करणारी, जंगलातील फळे आणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी एक अतिशय कमी शिकलेली महिला — महिला आरक्षणामुळे पुढे आली. काही राजकीय कपट असणाऱ्या, इतर वर्गातील लोकांनी तिला सरपंच करण्याचा डाव आखला. गावातील काही लोकांनी याला होकार दिला, तर काहींनी नकार दिला. पण “कोणी तरी व्हायलाच हवे” या भूमिकेतून अखेर तिच्याशी चर्चा झाली. तिच्या घरी बोलणी झाली आणि निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने सखुबाईला सरपंच करण्याचे ठरवले. यानंतर काही हुशार व कपटी सदस्य तिच्या घरी ये-जा करू लागले. “तुम्ही आता सरपंच होणार आहात, त्यामुळे थोडेफार खर्...

जंगलातील पशुपक्ष्यांची आपत्कालीन बैठक

इमेज
अग ये चिऊताई! चिऊताई तुझं घरट कुठे असतं. कावळा चिमणीला म्हणाला. चिमणी कावळ्याला म्हणाली.  कावळे दादा आता कसलं घरटं आणि कशाचं काही आता काहीच नाही राहिलं बघ.  अरे!आपलं झाडा झुडपात घरटं असायचं. आता ह्या लोकांनी झाडं झुडप ठेवलीच नाहीत. मी कुठेतरी गवताची कापसाची बोळे, काड्या कुड्या आणून एखाद्या इमारतीच्या गच्चीत किंवा एखाद्या खिडकीच्या बोळात किंवा एखाद्या पत्र्यामध्ये घर बांधते.  माझी पोर त्याच्यामध्ये उकड्याने कधीकधी गुदमरतात. कधी घर चांगलं नसल्यामुळे खाली पडतात. अगदी नकोस झालय बघ.  दादा बर ते जाऊ दे. पण पूर्वी शेतीवाडी व्हायची. सर्व काही व्हायचं. त्यामुळे खाचरा, वावरामध्ये अन्न मिळायचं. खाली पडलेलं धान्य वेचून पोटभर पशुपक्षी खायचे. आता ते पण नाही राहिलं बघ.  आता काय सिमेंट खायचं? अरे कुठेतरी कचऱ्यामध्ये काहीतरी भेटलं तर तेच उचलून आणायचं आणि तेवढेच पोराला द्यायचं. नाही गांडूळ, नाही किडामुंगी त्यामुळे ते पण अन्न गेलं. आता काढायचं कसंतरी.  अरे दादा, तू मला सर्व विचारलं. पाहिला तू माझ्या दारात यायचा. अन्न खायचा, विचारून जायचा, आता तसं मला काहीच तुला देता येत नाही...

गावाकडची शेती आणि प्राणी मित्र

इमेज
गावाकडची शेती आणि प्राणी मित्र  माझं गाव अगदी डोंगर कपाऱ्याला वाडी होती. आमच्या वाडीच्या वरच्या बाजूला आमची वडीलोपार्जित जमीन होती. भाताची शेत, ज्वारीचा माळ, गवताचा माळ, नाचणीचे दळे, गुराढोरांची पडाळ त्या शेजारी आणि पाठीमागे काकडी, आळवड, डांगर भोपळा, कारली, दोडका इत्यादीचे वाडगे असायचे.  शेजारीच वांगी, आणि मिरच्या लावलेल्या  असत.  आजी तिच्या शेतीवाडीला खुप जीव लावायची. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीनही ऋतूमध्ये  वाड्यामधील हा सर्व भाजीपाला, फळ फळावर फुलत राहायची.  तेथेच आंब्याची एक दोन झाडं होती. पेरूचे झाड होतं. आम्ही लहान असताना आम्हाला हे सर्व खायला मिळायचं. त्यामुळे तिथंच आमच्या आजोबांनी सहा खणाचे जंगली लाकडं व कौलाचं.घर बांधलं होतं. आमचा परिवार साधारण मोठा होता. सर्व माणसं गुण्यागोविंदाने नांदायची. घरामध्ये दूध, भुईमुगाच्या शेंगा, गूळ, मध दही, तूप कायम असायचं.  माझा मामा पैलवान होता. पूर्वी हेच सर्व ओरिजनल व चांगलं खायला मिळायचं. त्यामुळे माणसं निरोगी असत. भाकरी दुधात चुरून खाण्याची मजा और होती.  लसणाची पाट्यावर वाटलेली मिरची,  बेसन भ...