दलालांच्या जाळ्यातला शेतकरी



उन्हातान्हात शेतात राबतो कष्टकरी शेतकरी,

घामाच्या धारांनी भिजते त्याची सारी काया सारी;

तुम्हा-आम्हाला अन्न देतो, स्वतः मात्र उपाशी राहतो,

नशिबाच्या ओझ्याखाली तो रोजच जगत राहतो.

खत-पाणी, मशागत करून पिकवतो तो शेती,

आशेच्या पंखांवर बांधतो सुखाची एक स्वप्नरेषा नवी;

पण हातात पीक येताच भाव अचानक कोसळतो,

त्याच्या कष्टांचा सारा हिशोब क्षणातच विस्कळीत होतो.

"यंदा पीक चांगलं आलं!"मनात तो हसतो थोडा,

कर्ज फेडून मुलीच्या लग्नाचा बांधतो गोड गोड धागा;

पण बाजारात जाताच वास्तव त्याला छळतं,

भावाच्या घसरणीने स्वप्नांचं घर कोसळतं.

शहरात येतो आशेने पिक विकण्यासाठी,

पण दलालांच्या जाळ्यात अडकतो नकळतच भारी;

कमी भाव देऊन त्याला गुदमरवलं जातं,

त्याच्या कष्टांचं मोल मात्र मातीमोल होतं.

कधी रस्त्यावरच पीक फेकून देतो हताश होऊन,

आकाशाकडे पाहत रडतो मनातच तुटून;

अखेरीस नाईलाज होतो, जगणंही ओझं वाटतं,

आणि कुठेतरी फास घेऊन जीवन संपतं...

म्हणतात शासनाने दिलं बरंच काही,

पण त्याच्या हाती काहीच आलं नाही;

सर्व दलालांनी वाटून घेतलं आपापलं,

आणि खऱ्या हक्कदाराला वाऱ्यावर सोडलं.

आज सर्वत्र उभे आहेत मोठे दलाल, भोंदू साधू,

भुलवून जनतेला करताहेत स्वतःचं राज्य;

सत्य हरवतंय, अन्याय वाढतोय रोज,

आणि शेतकरी मात्र हरवतोय हेच आहे आजचं ओझं.

सुदाम मदगे (किवळे, मावळ, पुणे)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

लग्न जमण्याच्या पद्धती काल आणि आज