ग्रामीण भागातील वाढती व्यसनाधीनता
संत्या असं म्हणताच सखूने रिकामा पिठाचा आणि तांदळाचा डबा आपटला.
“दोन दिवस झाले पोरांना पेज देऊन अर्ध्या पोटी ठेवतेय… ती उपाशी आहेत. तुला कसली भाकर देऊ?”
हे ऐकून संत्या काही बोलला नाही. घोटभर पाणी पिऊन तो उपाशीपोटी कामाला निघून गेला…
ही कथा केवळ संत्या-सखूची नाही, तर पूर्वीच्या ग्रामीण भारताची वास्तविकता आहे.
त्या काळात अन्नधान्याची टंचाई होती. लोक जंगलातील कुरडयाची भाजी, उंबर, मोहाची फुलं आणि इतर वनफळांवर जगायचे. पडलं ते खायचं आणि नशिबाला दोष द्यायचा हेच आयुष्य होतं.
एखादं कार्य किंवा सण आला कीच पोटभर जेवण मिळायचं बाकी दिवस कसेतरी ढकलायचे.
काळ बदलला… पण समस्या बदलली का?
गेल्या ५० वर्षांत परिस्थितीत मोठा बदल झाला.
शिक्षण वाढलं, नोकऱ्या उपलब्ध झाल्या, गावागावात उद्योगधंदे सुरू झाले.
पूर्वी जिथे दोन-तीन गावात एक गाडी असायची, तिथे आज प्रत्येक घरात गाडी आहे.
पण या प्रगतीसोबत एक मोठं संकट उभं राहिलं व्यसनाधीनता.
आजची पिढी कुठे चालली आहे?
आजची तरुण पिढी मोबाईल, Instagram, YouTube सारख्या माध्यमांत गुंतली आहे.
चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचा प्रभाव जास्त पडतो आहे.
रात्री १२–१ वाजेपर्यंत रस्त्यावर भटकणं
मोबाईल गेम्स, जुगार, दारू पार्ट्या, वाईट संगत, बेफिकीरी आणि गैरजबाबदारी
आई-वडील अजूनही शेतात राबत आहेत, पण मुलं मात्र कमाईपेक्षा खर्च आणि व्यसनात अडकली आहेत.
कमाईपेक्षा व्यसनाचा खर्च जास्त
अनेक मुलं महिन्याला ५–६ हजार घरात देतात, पण
१०–१५ हजार रुपये स्वतःच्या व्यसनावर उडवतात.
शेतीत काम करायला तयार नाहीत
घरातलं सगळं तयार मिळतं
जबाबदारीची जाणीव नाही
काही तर इतके पुढे जातात की
बापाला सांगून जमीन विकतात
बैलजोडी विकतात
घरचे पैसे काढून उधळपट्टी करतात
वाईट संगत आणि त्याचे परिणाम
एमआयडीसी किंवा शहरात कामासाठी गेलेली मुलं विविध संगतीत अडकतात—
गटबाजी, राजकीय वाद,गैरधंदे,भांडण
यातूनच पुढे गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता वाढते.
कधी कधी परिस्थिती इतकी बिघडते की नशेत मुलं स्वतःच्या आई-वडिलांवर हात उचलतात ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.
आजची ही बेफिकीरी उद्याच्या आयुष्याला धोकादायक ठरते.
ना लग्नाची जबाबदारी
ना कुटुंबाची चिंता,ना भविष्याची योजना
“आजचा दिवस मजेत गेला की झालं” — ही मानसिकता धोकादायक आहे.
एक सजग संदेश
मित्रांनो,
तुमचं वय हे कमावण्याचं, उभं राहण्याचं आणि आयुष्य घडवण्याचं आहे.
वाईट व्यसनांपासून दूर राहा
वाद-विवाद टाळा
आई-वडिलांचा आदर करा
प्रामाणिकपणे काम करा
उगाच गाफील राहून आयुष्य बरबाद करू नका.
तुरुंगाच्या बेड्या घालण्यापेक्षा यशाची शिदोरी बांधा.
इच्छाशक्ती हेच सर्वात मोठं साधन आहे
प्रामाणिकपणा आणि माणुसकी हेच खरे हत्यार आहे
मन स्थिर असेल तर आयुष्यही स्थिर राहते
रस्ता कितीही कठीण असला तरी ध्येय चांगलं असेल, तर अडचणी नक्की दूर होतात.
आपण सक्षम आणि सुरक्षित असलो, तरच आपलं कुटुंब सुरक्षित राहपणच देशाचं भविष्य आहोत त्यामुळे चांगल्या मार्गावर चालणं ही आपली जबाबदारी आहे.
धन्यवाद!
सुदाम मदगे (किवळे,अंदर मावळ,पुणे)

खुप छान लेख,
उत्तर द्याहटवा