आता कसं होणार? — भाग २

मित्रहो, या कथेतला पहिला भाग आपण पाहिला. सावकाराच्या कर्जाला कंटाळून शेतकरी धोंडू आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. त्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या मुलाच्या आयुष्याची खरी झुंज सुरू होते…

धोंडूला सुरेश नावाचा एक मुलगा होता. तो दहावी–बारावीमध्ये शिकत होता. आई-वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच तो शाळेतून गावाकडे धावत आला. घरात शोककळा पसरली होती. सुरेश आजीच्या पाया पडला, रडला… पण काही वेळाने त्याला जाणवलं आता इथे थांबून काही होणार नाही.

चुलत काका धक्क्याने जवळपास बधिर झाले होते. घरातील परिस्थिती बिकट होती. शेवटी सुरेशने ठरवलं काहीतरी काम करायला हवं. तो गावच्या पाटलांकडे गेला.

“पाटील साहेब, मी आता काय करू?” सुरेशने विचारलं.

पाटील म्हणाले, “तू तालुक्याला जा. तुझी कागदपत्रं काढ. मी तुझी नोकरी लावायचा प्रयत्न करतो.”

सुरेश आशेने तालुक्याकडे निघाला. पण तालुक्यात त्याचं कोणी नव्हतं. तो स्टेशनवरच राहू लागला.

राजकीय सभेचा प्रभाव

त्याच दिवशी तालुक्यात एका मोठ्या राजकीय नेत्याची सभा होती. सुरेश गर्दीत उभा राहून भाषण ऐकत होता.

“तरुणांनो, शिका! मोठे व्हा! समाजसेवा करा! जंगल वाचवा, पाणी वाचवा, देश घडवा!”

हे शब्द सुरेशच्या मनाला भिडले. त्याच्या आयुष्याला दिशा मिळाल्यासारखं वाटलं.

सभा संपली आणि सुरेश पुन्हा आपल्या वास्तवाकडे परतू लागला…

गैरसमज आणि जीवघेणी घटना

त्याचवेळी तालुक्यात एका श्रीमंत घरावर दरोडा पडला होता. पोलिस आणि चोरटे पाठलाग करत होते. पोलिसांनी गोळीबार केला. स्टेशनकडे धावत असलेल्या सुरेशच्या हातात फाईल आणि कपडे होते. पोलिसांना संशय आला “हा चोरांचा साथीदार असावा!”

पोलिसांनी त्याला पकडलं.

“बाकीचे साथीदार कुठे?” पोलिसांनी विचारलं.

“साहेब, मी चोर नाही… मी नोकरी शोधायला आलोय,” तो घाबरून म्हणाला.

शेवटी सुरेशने चोर लपलेल्या इमारतीची माहिती दिली. पोलिसांनी चोरांना पकडलं. पण चोरांनी सुरेशला धमकी दिली “तुला आम्ही सोडणार नाही!”

सुरेश पुन्हा स्टेशनवर परतला… पण आता त्याचं आयुष्य वळण घेणार होतं.

मुलीची भेट आयुष्य बदलणारी घटना

तालुक्यात तमाशा करणारी तमसगीरबाई राहत होती. तिच्या ओळखीचा एक गुंड एका दिवशी तिच्या घरी गेला. घरात तिची तरुण मुलगी एकटी होती. त्या गुंडाने तिच्यावर वाईट नजरेने हात टाकण्याचा प्रयत्न केला.

ती मुलगी कसाबशी सुटली आणि पळत पळत स्टेशनवर आली…

तिथेच तिची आणि सुरेशची नजरानजर झाली.

सुरेशने तिला विचारलं “काय झालं?”

तिने सगळं सांगितलं. रात्री दोघं एकाच पडीक इमारतीत थांबले. दुःख, भीती आणि एकटेपणातून त्यांच्यात मैत्री झाली… आणि हळूहळू प्रेम फुललं.

दोघांनी ठरवलं 

समाजासाठी काम करायचं!

समाजसेवेची सुरुवात

दोघं तालुक्यात पोस्टर लावू लागले.

जंगल वाचवा

पाणी वाचवा

समाज जागृत करा

त्यांच्या कामाची चर्चा होऊ लागली.

पण पूर्वीचे दरोडेखोर सुटले होते. त्यांनी सुरेशला पाहताच मारहाण केली. मुलगी धाडसाने पुढे आली आणि गुंडांना पळवून लावलं.

बेरोजगारीचा धक्का

सुरेश एका कंपनीत मुलाखतीला गेला. पण कमी पगारात काम करायला तयार असलेला बाहेरगावचा मुलगा निवडला गेला. सुरेश निराश झाला… पण थांबला नाही.

आयुष्याचा मोठा निर्णय

दोघांनी ठरवलं 

लग्न करायचं आणि गावात जाऊन समाजसेवा करायची.

ते गावात गेले आणि जनजागृती सुरू केली.

खेड्याकडे चला

जमीन वाचवा

समाज जागवा

गावकऱ्यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली. सुरेशला ग्रामपंचायत सदस्य करण्यात आलं… आणि पुढे तो सरपंच झाला.

पण संघर्ष अजून बाकी आहे…

मुलीची आई काय करेल?

गावातील गुंड काय करतील?

समाजकार्यात कोणते अडथळे येतील?

ही कथा अजून पुढे चालूच आहे…

भाग २ समाप्त

✍️ सुदाम मदगे, किवळे, अंदर मावळ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था