त्यांच्या कष्टावर , पैशावर जगायचं
शेतकरी कष्टकरी श्रमिक यांच्या धन धान्य , साहित्य अलगद वापरायचे आणि त्यांच्या कष्टाच्या पैशा वर आम्हाला जगायचे
त्यांना काबड कष्टातून आम्हाला बाहेर नाही काढायचे त्यांच्या कष्टावर त्यांच्या पैसा वर वाटल तेवढा टॅक्स बसवून त्यांना बनवायचे आणि त्यांच्याच पैशावर आम्हाला मनसोक्त जगायचंय
निवडणुकीमध्ये वाटल तेवढी आश्वासन देऊ प्रत्यक्षात त्यांच्या हाती गाजर देऊ आणि मजा घेऊ असं जरी असलं तरी त्यांच्याच जीवावर आम्हाला जगायचे
त्यांची सर्व परी पिळवणूक करू त्यांचा रक्त शोषून त्यांना मारझोड करू वरडून आरडून मेले तरी त्याची काही नाही पडली तरी पण त्यांच्याच कष्टावर पैशावर आम्हाला जगायचे
अहो हे कसले लोक आम्ही म्हणजे सर्वस्वी देव माणूस ही सर्व जंगलातील दगड गोटे त्यांना आम्ही फोडून तोडून सर्व काही त्यांचं घेऊ
त्यांना तात्पुरती एखादी चपटी देऊन त्यांचं सर्व काही काढून घेऊ
निवडणुकीमध्ये वेगळी वेगळी आश्वासन देऊ त्यांना मात्र आम्ही असंच भुलवत राहू तरीपण त्यांच्या जीवावर कष्टावर जगायचं
त्यांच्या जीवावर आमचं लाखोचं करोड करोडचा अब्जे करू आणि ह्या देशातून पळून जाऊ या देशातले धनवंत होऊ ह्या देशातलं अब्जपती होऊ आम्हाला त्यांचं काही घेणं देण नाही असे आम्ही राजकर्ते होऊ आणि एक देशासमोर आदर्श ठेऊ
आम्ही कशाला काम करू सत्ता येताच सर्व मडकी गाडगी एकदम भरू त्यांना बनवून परदेशी फिरू
बोंबलू द्या ओ सी बी येडी yपिढी57 अण्णा फिन्ना त्यांना आम्ही खिशात घेऊ आणि गरगर फिरवून परत त्यांच्याकडूनच आमचा हिशेब काढून घेऊ त्यांच्या पण जीवावर आम्हाला जगायचे
धन्यवाद
सुदाम मदगे (किवळे, वडगाव मावळ)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा