असं आहे का राजकारण?



असं आहे का राजकारण?

अख्खा समाज बोलतोय,

वाड्या-पाड्यांमध्ये दरी निर्माण करतोय,

भावकीमध्ये भांडण लावतोय,

तंटामुक्ती करण्याऐवजी

तेढ निर्माण करतोय —

असं काय आहे राजकारण?

कोण कुणाचा भाऊ पळवतोय,

तर घरातील माणसं फोडतोय,

अखी समाज व्यवस्था विस्कळीत करतोय 

असं आहे का राजकारण?

एका गावात अनेक पक्ष,

एकमेकांची डोकी फोडतोय,

समाजाचं हित सोडून

स्वार्थासाठी भांडतोय.

समोर येता गोड बोलतोय,

मागं मात्र वैरी होतोय.

कोण कोणाला मारतोय,

निवडून आल्यानंतर

जो-तो बाजूला होतोय.

पडलेला राजकारणी

दुसऱ्याचा बदला घेतोय,

आणि एखादा तिसरा

निवडणुकीत पडला म्हणून

दिलेले पैसे परत मागतोय —

असं आहे का राजकारण?

पूर्वी पाटील बोलायचा

ते घडायचं,

आता गटातटामुळे

भलतंच घडतंय.

त्यामुळे समाज

प्रगतीपासून दूर ढकलतोय.

कधी इकडं, कधी तिकडे,

स्थिर नाही.

पक्ष समाजाचा फायदा घेऊन

आपलं पोट भरतोय —

असं आहे का राजकारण?

हे करतो, ते करतो

असं म्हणत सुटतोय,

पण निवडून आल्यानंतर

काहीच नाही करतय.

महिना-दीड महिना

दारोदार फिरतोय,

तरुणांना फितवतोय,

त्यांना सर्वकाही देतोय,

आणि त्यामध्येच

आम्ही गार होतोय —

असं आहे का राजकारण?

ना रस्ता,

ना शिक्षण,

ना आरोग्य —

वाड्या पाड्यांमध्ये 

कायम दिसते 

रस्ता नसल्याने 

गरोदर बाईला 

झोळीत न्यायला लागते 

तर कितीतरी मुलं उपासमारीने 

भूकबळीने व्याकुळ होतंय

योजना बऱ्याच दिल्या 

पदरी नाही पडल्या 

कागदाच्या अंगठ्याने 

त्या गायब झाल्या

वाड्या-पाड्यांमध्ये

हे कायम दिसतंय.

गोरगरीब कष्ट करून मरतोय —

असं आहे का राजकारण?

आपण सावध झालं पाहिजे,

बॉण्डवर लिहून घेतलं पाहिजे,

किमान प्राथमिक सुविधा

आम्हाला दिल्याच पाहिजेत —

यावर ते ठाम पाहिजेत.

चला, उठूया.

निर्णय करूया.

आपण आपल्यापासून

सुरुवात करूया.

यावर आपण ठाम पाहिजे.

तरच सक्षम नेता मिळेल,

प्रगती होईल 

वाड्या-पाड्याला.

म्हणून म्हणतोय —

असा राजकारणी

मिळाला पाहिजे.

कवी :- सुदाम मदगे किवळे, अंदर मावळ 

टिप्पण्या

  1. खूप हुबेहूब मांडणी केली आहे साहेब तुम्ही जशी मांडणी केली आहे तसेच राजकारण चालू आहे पण त्या राजकारणी लोकांचा काही दोष नाही साहेब दोष आहे तो सर्व सामान्य माणसाचा कारण सर्व सामान्य माणूस लाचार बनला आहे खूप सुंदर लेखन साहेब सलाम तुमच्या लेखणीला 👌👌🙏🙏 दत्ता आंबेकर अध्यक्ष दे आई प्रतिष्ठान

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था