जयश्री गडकर

जयश्री गडकर



जयश्री यांचा जन्म २१ मार्च १९४२ साली कर्नाटकच्या कारवार जिल्ह्यातील सदाशिवगड या गावी एका साध्या कोकणी कुटुंबात झाला. 

जयश्री गडकर या पाच वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब कामासाठी मुंबईत आलं आणि इथेच स्थायिक झालं. 

त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळेत झाले. शिक्षणाची आवड असतानाही त्यांना फारस शिक्षण घेता आलं नाही. त्यांना गाण्याची आणि नृत्याची लहानपणा पासूनच आवड होती. त्यामुळे आपसुकच कला क्षेत्राशी त्यांची ओढ अधिक होती. त्यांनी लहानपणीच नृत्य शिकण्यास सुरूवात केली. 

प्रसिद्ध कथ्थक नर्तक गुरू गोपीकृष्ण यांच्याकडे त्यांनी कथ्थक नृत्याचे आणि पुढे जाऊन गायनाचे धडे घेतले.

तमाशा' हा जयश्री यांनी बालकलाकार म्हणून केलेला पहिला सिनेमा होता. त्यानंतर १९५५ साली व्ही. शांताराम यांच्या 'झनक झनक पायल बाजे' या सिनेमात जयश्री गडकर यांना एका नृत्य करणाऱ्या मुलींच्या भुमिकेसाठी घेतलं होतं. तेव्हा त्याचं वय अवघं १३ वर्ष होतं. 

पुण्यातील एका कार्यक्रमात नृत्य सादरी करण करत असताना राम देवताळे या फोटोग्राफरनं जयश्री यांचे फोटो त्याच्या स्टुडिओमध्ये लावले. त्यांचे हे फोटो पाहून दिनकर पाटील यांनी त्यांना 'दिसतं तसं नसतं' या सिनेमात नृत्य करण्याची संधी दिली. या गाण्यावेळी दिग्दर्शक राजा परांजपे यांनी जयश्री यांना पाहिलं आणि "गाठ पडली ठाका ठाका" या सिनेमात अभिनेत्री म्हणून काम दिलं.

झनक झनक पायल बाजे' या चित्रपटा  पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे आलिया भोगासी या चित्रपटातून त्यांची नायिका म्हणून कारकीर्द सुरू झाली. 

राजा परांजपे दिग्दर्शित ‘गाठ पडली ठका ठका’ या चित्रपटात त्यांना सर्वप्रथम महत्त्वाची भूमिका मिळाली. 

त्यांनी ‘सांगत्ये ऐका’ ‘अवघाची संसार’ मानिनी, रंगपंचमी, शाहीर परशुराम, बाप माझा ब्रह्मचारी, मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, वैशाखवणवा, साधी माणसं, पाटलाची सून, एक गाव बारा भानगडी, जिव्हाळा, घरकुल, सुगंधी कट्टा, आदी महत्त्वाच्या चित्रपटांमधून भूमिका साकारल्या. 

तमाशाप्रधान, ग्रामीण चित्रपटातील नायिका अशी त्यांची ओळख तयार झाली होती. त्या वेगळ्या भूमिकांना न्याय देऊ शकणार नाहीत अशी त्यांच्याविषयी चर्चा होत असतानाच आपल्या ‘मानिनी’ चित्रपटातून या चर्चेला त्यांनी चोख उत्तर दिले.

१९५० ते १९६०या कृष्णधवल चित्रपटाच्या काळात जयश्रीबाईंनी भालजी पेंढारकर, राजा परांजपे, अनंत माने, दिनकर द. पाटील, दत्ता धर्मा धिकारी, राजा ठाकूर, गजानन जागीरदार, वसंत पेंटर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकां कडे काम केले. प्रत्येकाची वेगळी दिग्दर्शन शैली त्यांनी अनुभवली. 

त्यांनी राजा गोसावी, सूर्यकांत, चंद्रकांत, अरुण सरनाईक या सहकलाकारांबरोबर केलेल्या भूमिका विशेष गाजल्या.

व्यक्तिरेखेच्या मागणीनुसार शिकत राहणे, परिश्रम घेत राहणे हा त्यांचा स्थायीभाव होता. भालजी पेंढारकरांच्या ‘साधी माणसं’ या चित्रपटासाठी त्यांनी लोहाराचा भाता चालवण्याचे तंत्र अवगत केले आणि मगच त्या कॅमेर्‍यासमोर गेल्या. भाता चालवतानाचे ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे..’ हे गाणे अजरामर ठरले.

१९६१ साली प्रदर्शित झालेल्या मानिनी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वप्रथम राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

१९५९ मध्ये सांगते ऐका या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडवला. यामध्ये जयश्री गडकर यांनी एका तमासगिरणीची भूमिका रंगवली. हा चित्रपट मराठीतला त्या काळातला सुपरहिट चित्रपट ठरला. 

या चित्रपटातील जयश्री यांच्या ‘बुगडी माझी सांडली ग’ या गाण्यावरील लावणी नृत्याने त्या उत्कृष्ट नृत्यांगणा म्हणून पुढे आल्या. त्यांची ही लावणी आजही महाराष्ट्रातील लावणी प्रेमी व तरुणाईला वेड लावते. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ‘रसरंग’पुरस्कार मिळाला. 

त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही व पुढील पन्नास वर्ष मराठी चित्रपट सृष्टीत आपले स्थान अढळ ठेवले. 

त्यांनी तमाशा पटा बरोबरच अनेक कौटुंबिक, भावनाप्रधान, विनोदी, ऐतिहासिक चित्रपटातूनही आपला अभिनय प्रेक्षकांसमोर सादर केला.

मराठी बरोबरच त्यांनी ‘एक अरमान मेरा’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टी सही पदार्पण केले.अभिनेते अशोक कुमार यांच्याबरोबर नयीकेची भूमिका असलेला प्रायव्हेट सेक्रेटरी हा त्यांचा चित्रपट चांगलाच भावला. 

हिंदी चित्रपट सृष्टीत धार्मिक, पौराणिक, चित्रपटात त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. तसेच त्यांचे सारंगा चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेले ‘तेरी याद में’ हे गाणे आजही रसिकांच्या स्मरणात आहे.

त्यांनी आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकीर्दीत २५० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अशी असावी सासू, एक गाव बारा भानगडी, दिसतं तसं नसतं, मोहित्यांची मंजुळा, वैजंता, वैशाखवणवा, सवाल माझा ऐका, सांगत्ये ऐक, अवघाची संसार, बाप माझा ब्रह्मचारी, मोहित्यांची मंजुळा, साधी माणसं, कडकलक्ष्मी, मल्हारी मार्तंड, आई कुणा म्हणू मी, पाटलाची सून, सुन लाडकी या घरची, जिव्हाळा, आदी महत्त्वाच्या चित्रपटांमधून भूमिका साकारल्या.

जयश्री यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला, 

गेला हटकून बाई भरल्या बाजारात, 

बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला, 

तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं, 

फड सांभाळ तुर्याला ग आला, 

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा,

 माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं,

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहुदे

चढाओढीने चढवीत होते, 

नाचू किती लाजू किती कंबर लचकली 

या अजरामर गीतामुळे त्या कायम प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या.

१९७५ साली जयश्री गडकर यांनी अभिनेते बाळ धुरी यांच्याबरोबर लग्न केलं. विवाहाच्या वेळी जयश्री गडकर या मराठी चित्रपटातील आघाडीच्या नायिका होत्या, तर त्यांच्या तुलनेत बाळ धुरी यांची नाटक-चित्रपटातून सुरुवात झालेली होती. या दोघांचा विवाह ‘प्रेमविवाह’ असेल असे अनेकांना वाटते. 

पण हा प्रेमविवाह नव्हता तर ठरवून केलेले लग्न होते. लग्नानंतरही त्यांनी त्यांचा अभिनय सुरू ठेवला. लग्नानंतर त्यांनी मुंबई टू मॉरीशस सारखा सिनेमा, रामायण सारखी प्रसिद्ध मालिका केली. रामायणमध्ये त्यांचे पती बाळ धुरी हे दशरथाच्या भुमिकेत होते तर जयश्री यांनी कौसल्येची भुमिका साकारली होती.

जयश्री यांनी हिंदी, गुजराती, तमिळ, पंजाबी सिनेमातही काम केलं. त्यांना सलग ३ वर्ष राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 

२००८ साली जयश्री गडकर यांचं निधन झालं. त्या बरीच काळ आजारी होत्या. दीर्घआजारानंतर २९ ऑगस्ट २००८ साली त्यांचं निधन झालं.

             



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था