सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा
नयनतारा यांचा जन्म ५ जुलै १९५० रोजी झाला. नयनतारा यांनी अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर राज्य केले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपटात काम केले होते.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेले "शांतेचे कार्ट चालू आहे" या नाटकात लक्ष्मीकांत यांच्या आईच्या भूमिकेत आपल्याला नयनतारा यांना पाहायला मिळाले होते.
या नाटकातील नयनतारा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.
त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांना ऑन स्क्रीन वरील लक्ष्मीकांत यांची आई असे देखील म्हटले जात असे.
नयनतारा यांनी अशी ही बनवाबनवी (१९८८)
आई पाहिजे (१९८८)
आधार (२००२)
आनंदी आनंद, (१९८७)
कुंकवाचा करंडा (१९७१)
खुळ्यांचा बाजार (१९९२)
जिगर (१९९८)
तू सुखकर्ता (१९९३)
धांगडधिंगा (१९९९)
बाळा गाऊ कशी अंगाई (१९७७)
सगळीकडे बोंबाबोंब (१९८८),
चंगू मंगू (१९९०) यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
अशी ही बनवाबनवी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.
हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटात लिलाबाई काळभोर या भूमिकेत आपल्याला ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांना पाहायला मिळाले होते.
एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांचा नावलौकिक होता. विनोदी भूमिकांनाही त्यांनी न्याय दिला. बिनधास्त शैलीतील संवादफेक व मुद्राभिनय यासाठी त्या ओळखल्या जात होत्या.
अनेक वर्षे नयनतारा मधुमेहाच्या विकारानं त्रस्त होत्या. नयनतारा यांच्या निधनाच्या आठ वर्ष आधी त्यांचा डावा पाय शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला होता.
अखेरची काही वर्षं त्या सतत आजारी असल्याने १० वर्षं तरी त्या चित्रपट सृष्टीपासून दूर होत्या.
३० नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा दीपेश आहे.
अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील त्यांची भूमिका कायमची प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहील. 'बाळा गाऊ कशी अंगाई' या चित्रपटातील नयनतारा आणि विक्रम गोखले यांच्यावर चित्रित झालेल
"धुंदीत गाऊ,मस्तीत राहू" हे गाण आजही आपल्या आठवणीत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा