संगीत प्रधान चित्रपट बैजू बावरा

 

संगीत प्रधान चित्रपट बैजू बावरा 

आज आपण घेणार आहोत हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीत क्षेत्राचा आढावा 1952 साली प्रदर्शित झालेल्या "बैजू बावरा" या चित्रपटाला 1954 चा पहिला भारतीय फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला तो म्हणजे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक नौशादजी यांना. 

बैजू बावरा या सिनेमात भारत भूषण आणि मीना कुमारी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची गाणी शकील बदायुनी यांनी लिहिली होती तर संगीत साथ नौशाद जी यांनी. या चित्रपटाची गाणी मोहम्मद रफी, लता मंगेशकर शमशाद बेगम,पंडित आमिर खाँ व दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांनी गायली होती.

बैजू बावरा हा एक संगीत प्रधान चित्रपट होता. या चित्रपटातील ' तू गंगा की मौज और मै यमुना का धारा' हे गीत रफी साहेबांनी अतिशय सुंदर असं गायलेले आहे. आजही ही हे गीत ऐकले की मन प्रसन्न होऊन टवटवीत आणि ताजेतवाने होते व वेगळाच आनंद देते.                         

या चित्रपटातील दुसरं गीत होतं "आज गावात मन मिरो झुमके". हे गीत पंडित आमिर खाँ आणि दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांनी गायलं होतं. हे गाणं क्लासिकल असून शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या दर्दी रसिकांना हे गीत वेगळ्या भावविश्वात नेते. 

यानंतरचे गीत होतं "ओ दुनिया के रखवाले" हे 'दरबारी' रागातील गीत मोहम्मद रफी साहेबांनी अतिशय सुंदर पद्धतीने गायले होते. अर्तता, विवशता, व्याकूळता आणि क्रोध यांचा अपूर्व संगम या गाण्यात पाहायला मिळतो. 

यानंतरचे गीत होतं "दुर कोई गाये"  हे देश या रागातील अतिशय सुंदर असं गीत लता मंगेशकर आणि शमशाद बेगम यांनी गायलं होतं. आजही हे गीत ऐकल्यावर कानांना मधुर वाटतं.

त्यानंतरचं गाणं होतं "मोरे भूल गये सावरिया" हे गीत सुद्धा खूपच सुंदर  आहे.               

या चित्रपटातील यानंतरचे  गीत होते" मन तडपना हरिदर्शन आज" हे शास्त्रीय संगीतावर आधारित गीत मोहम्मद रफी यांनी अप्रतिम गायलं होतं.                                 

त्यानंतरचे गीत होते "बचपन की मोहब्बत" हे गीत लता मंगेशकर यांनी अतिशय सुंदर गायलं होतं.                        

त्यानंतरच गीत होते; इंसान बनो रे, हे तोडी रागातील गीत मोहम्मद रफी यांनी गायलं होतं.

यानंतरचे दुसरे गीत होते "टोरी जय जय करतार"  हे पुरी या रागातील गीत पंडित आमिर खाँ यांनी गायलं होतं. हे गीत शास्त्रीय पठडीतले होते.

यानंतरचे गीत होते "लंगर कंकरिया जिने मारो" हे पंडित आमिर खाँ आणि दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांनी गायलं होतं. या गाण्यात या दोघांची जुगलबंदी पाहायला मिळते.

अमीर खाँ यांच्या आवाजातील "घनन घनन जोरे" हेही अतिशय सुंदर गीत होते.

त्यानंतर आमीर खा यांच्या आवाजातील दरबारी  रागातील सरगम हे गीत होते.

तर अशा या वेगवेगळ्या रागदारीतील संगीतप्रधान असा हा चित्रपट होता. शकील बदायुनी यांची शब्दरचना आणि नौशादजी यांचं संगीत लाभलेल्या "बैजू बावरा" या चित्रपटातील गाणी आजही  ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन संगीतात न्हाऊन निघते.

कधीही ही  गाणी तुम्ही युट्युब वर पहा. खूपच सुंदर व अल्हाददायक अशी ही गाणी  आणि संगीत हे भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेली देणगी आहे. आणि म्हणूनच या चित्रपट संगीताला पहिला भारतीय फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला.

 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

आजच्या गावांची दैन्यावस्था