पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अखेर काय? माणूस, सत्ता, संपत्ती आणि निसर्गाचा समतोल

इमेज
अखेर काय? माणसाच्या इच्छा-आकांक्षा इतक्या वाढल्या की त्या कधीच संपल्या नाहीत. अपेक्षा वाढत गेल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी माणूस कोणत्याही स्तराला जाऊ लागला. नातेसंबंध तुटले, माणुसकी हरवली, प्राणी-पक्ष्यांवरचे प्रेम कमी झाले. आर्थिक, सामाजिक व राजकीय गरजा वाढत गेल्या आणि त्या गरजांच्या पूर्ततेसाठी माणसाने सामाजिक समतोल बिघडवला. सर्व काही असूनही मान-अपमान, तुलना आणि स्पर्धा वाढत गेली. निसर्गावरचा अन्याय माणसाने जंगल उद्ध्वस्त केली, प्राण्यांचे अधिवास नष्ट केले. त्यांना उघड्यावर, डोंगरकपारीत व बिळांमध्ये राहण्यास भाग पाडले. सावली नाही, पाणी नाही, सुरक्षितता नाही—असा असमतोल निर्माण झाला. आपण किती नुकसान करत आहोत, किती जाळपोळ करत आहोत, हे भानच माणसाला राहिले नाही. परिणामी निसर्ग आणि प्राणीमित्रांचा रोष आपल्यावर कोसळू लागला आणि नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले. वाढती विषमता गरीब गरीबच राहिला, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेला. राजकारणाचा विचार करायचा तर घराणेशाही, वाढलेल्या अपेक्षा आणि राजेशाही जीवनशैली यामुळे सामान्य माणूस फसवला गेला. वेळप्रसंगी गोड बोलून लोकांचा वापर करून घेतला गेला—ह...

अजितदादा सलाम तुमच्या कार्याला

इमेज
हे काय घडतंय, कळेनासं झालं आहे. अपेक्षित असं काहीच घडत नाही. मनाची अवस्था समजत नाही आणि ती कुणापर्यंत पोहोचवावी हेही उमगत नाही. माणसं गोड असतात, नाती सुंदर असतात; पण त्या नात्यांनाही एक मर्यादा असते. इच्छा-आकांक्षा असतात, स्वप्नं असतात, पण भगवंताने आखून दिलेल्या रेषा मर्यादित असतात. त्या मर्यादेच्या पलीकडे गेलं की अपमान पदरी पडतो, आणि शेवटी उरतो तो फक्त पश्चाताप. उगाच इकडे-तिकडे ओढाताण करत राहतो आपण. मर्यादा ओलांडल्यानंतर हातात काहीच राहत नाही. आबा आर. आर. नंतर तुमच्याशी ओढ निर्माण झाली. तुम्ही एकदा आमच्याकडे आलात आणि आम्ही सगळं विसरून तुमच्या प्रेमात पडलो. आमचं प्रेम तुम्ही स्वीकारलं की नाही हे आम्हाला कधीच कळलं नाही; पण आम्ही मात्र वेडेपिसे झालो. काही मिळेल की नाही याची पर्वा न करता, आम्ही तुमच्या मागे लागलो. ते प्रेम होतं… निखळ, निष्काम. पण आमच्या प्रेमाला साथ मिळण्याआधीच सगळं संपलं. तरीसुद्धा आम्ही तुमच्यापासून दूर गेलो नाही. कधी भेट होईल, कधी मुलाखत होईल, कधी फक्त दर्शन मिळेल याची चिंता कधीच केली नाही. फक्त तुम्हाला पाहून आम्ही कायम आनंदी राहत होतो. तुम्ही खूप दिलंत. कुणाचं भलं के...

तेवढा तरी लेकराला जमिनीचा तुकडा राहू द्या.

इमेज
पूर्वी वानर होती आणि वानरासारखीच काही माणसे होती, म्हणून त्यांना आदिमानव असे संबोधले जाई.  रामायणकाळात भगवान श्रीरामाच्या वनवासाचे वर्णन येते. त्या काळात भिल्ल, पारधी, कोळी तसेच डोंगर-दऱ्या व जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाने श्रीरामांना मोलाची मदत केली.  म्हणूनच रावणानेही श्रीरामांना वनवासी असे संबोधले होते. हे वनवासी म्हणजेच जल, जमीन आणि जंगल या संपत्तीचे खरे मालक म्हणजेच मूळ आदिवासी समाज. भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक तसेच महिला क्रांतिकारकांनी आदिवासींच्या जमिनी व पिकांच्या संरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळे जागरूकता निर्माण झाली आणि “जिथे कुळ तिथे जमीन” या तत्त्वावर आदिवासी समाज जमिनीचा मालक ठरला. परंतु कालांतराने आधुनिक विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बदल घडले. धरणे बांधली गेली, जलसाठे निर्माण झाले, रस्ते झाले, जंगलतोड झाली.  या सर्व तथाकथित विकासात सर्वाधिक भरडला गेला तो आदिवासी समाज. तुटपुंजा मोबदला देऊन त्यांना पुन्हा डोंगरदऱ्यांत हुसकावून लावण्यात आले आणि काबाडकष्ट करण्यास भाग पाडले गेले....

आत्महत्येची हत्या

इमेज
आज आपण जिकडे तिकडे पाहतो तिकडे प्रचंड स्पर्धा दिसते. माणसाच्या गरजा कधीच कमी झाल्या नाहीत; उलट त्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.  पक्षी, प्राणी आपल्या गरजांपुरते जगतात; परंतु माणूस मात्र अमर्याद गरजांच्या जाळ्यात अडकत चालला आहे.  या वाढत्या गरजांमुळे त्याची मानसिकता ढासळत आहे. पैशाची ओढ वाढली आहे, पण समाधान, स्थैर्य आणि खरे सुख हरवले आहे. माणूस सतत पैशाच्याच मागे धावताना दिसतो. “यांनी हे मिळवलं, त्यांनी ते साध्य केलं, तो पुढे गेला आणि मी मागे का?” या तुलनात्मक विचारांनी माणूस आतून पोखरला जात आहे. सर्व काही असूनही तो असमाधानी आहे.  हीच असमाधानाची भूक माणसाला कुठल्या टोकाला नेऊन ठेवते, हे आपण आज समाजात पाहत आहोत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये अजूनही एका वेळच्या अन्नासाठी काही लोक तडफडत आहेत.  अनेक दुर्गम भागांत भूकबळी जाणं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. याची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली असून केंद्र शासनावर ताशेरे ओढले आहेत. असाच एक माणूस प्रचंड आशावादी, काहीतरी मोठं करायची जिद्द असलेला — व्यवसायात उतरतो. पण नशिबाची साथ मिळत नाही.  धंद्यात तोटा होतो, पुढे ज...

बदलत्या काळातील समाज, शिक्षण आणि नातेसंबंध

इमेज
आजचा काळ हा झपाट्याने बदलणारा काळ आहे. वैज्ञानिक, तांत्रिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात बदल झालेले आपण अनुभवत आहोत.  पूर्वी शिक्षणाची साधने मर्यादित होती. आधुनिक तांत्रिक यंत्रणा, दळणवळणाची साधने किंवा कम्युनिकेशनची माध्यमे जवळजवळ नव्हतीच.  एखादा रेडिओ किंवा क्वचित टीव्ही एवढीच साधने होती, तीही आता कालबाह्य ठरली आहेत. आज टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली असून रेडिओ जवळजवळ इतिहासजमा झाला आहे. पिढ्यानपिढ्यांमध्ये झालेला बदल स्पष्टपणे दिसून येतो. चालीरीती, संस्कृती, राहणीमान, आचार-विचार यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले आहे.  आज योग्य दिशा व मार्गदर्शन, वाढलेली साधनसामग्री, बदललेली आर्थिक परिस्थिती आणि शासनाच्या विविध योजनांचा मोठा फायदा समाजाला झाला आहे.  यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती लक्षणीय झाली. मोठमोठ्या शिक्षणसंस्था, उच्च शिक्षणाच्या डिग्र्या उपलब्ध झाल्या. आज कोणी डॉक्टर झाले, कोणी अभियंते, कोणी एम.फिल., पीएच.डी. केली, तर कोणी आयटी क्षेत्रात नाव कमावले. काही प्राध्यापक झाले, काही पोलीस अधिकारी, तर काही शासकीय अधिकारी व कर्म...

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

इमेज
माझं लहानपण आजोळी गेलं. घरची परिस्थिती बेताची होती. गावातील सर्वच मुलांवर त्या काळी लहान वयातच कामाचा बोजा पडायचा.  गवत काढणी, भात कापणी, गुरे-ढोरे,सांभाळने, गवत कापून आणने ही सगळी कामं आमच्यासाठी रोजचीच होती.  या कामांतूनच उपजीविकेचा थोडाफार आधार मिळायचा. शाळेला जायचं तेव्हा तिथेच खाणंपिण मिळायचं. आश्रमशाळा होत्या, म्हणून दुर्गम ग्रामीण भागातील आम्हा मुलांना शिक्षणाची संधी मिळाली.  सुट्टी लागली की पुन्हा गावाकडे येऊन कामाला लागायचं. त्या शाळा नसत्या तर ग्रामीण भागातील अनेक मुलं शिकलीच नसती.  आजही इतके दुर्गम भाग आहेत की पावसाचे चार महिने माणसाला बाहेर पडता येत नाही; तेव्हा जे मिळेल ते खाऊन दिवस काढावे लागायचे. माझ्या मामाच्या गावातील तळपेवाडीतील आमच्यासोबत शिकलेली अनेक मुलं पुढे मोठ्या नोकऱ्यांमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये स्थिरावली.  लक्ष्मण दळवी, बाळू बुरसे, शांताराम वाजे, दत्तू दगडे, दत्तू तळपे, अनंता काठे, संभाजी अशी अनेक नावं आजही अभिमानाने घेतली जातात. तळपेवाडीचा मावळ परिसरात नावलौकिक आहे. तळपेवाडीचा मावळ तालुक्यात अजूनही दबदबा आहे. तरुण मंडळ, आणि पैलवान यांन...

जिवंत असूनही मेलेल्या अवस्थेत आई-वडील | सामाजिक वास्तवावर हृदयस्पर्शी लेख

इमेज
आपणास ज्ञात आहे की मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथांनी गुरुदक्षिणेसाठी वडिलांसाठी डोळा काढून दिला.  आई-वडिलांची अपार सेवा करणाऱ्या श्रावणबाळाची कथा सर्वश्रुत आहे.  भक्त प्रल्हादासाठी भगवानांनी नरसिंह अवतार धारण केला, हे भक्तीचे सर्वोच्च उदाहरण आहे. भगवान श्रीरामांची भक्ती करणारी भिल्ल स्त्री शबरी उष्टे बोर अर्पण करते आणि राम ती भक्ती म्हणून स्वीकारतात—ही केवढी मोठी श्रद्धा! रामाच्या वनवासात खरा वनवास कोणाचा झाला असेल, तर तो लक्ष्मणाचा झाला. भावावरील माया, श्रद्धा, भक्ती व सेवा यांची ही सर्व उदाहरणे आहेत. कथेमध्ये कधी कधी अशा उदाहरणांची आवश्यकता असते—एवढाच हा भाग. खरी हकीगत अशी आहे— जुन्या काळात, आमच्या गावातील दशरथला बऱ्याच वर्षांनी मूल झाले. नशीब फळाला आले होते. एक वर्षाने दोन मुलगे झाले. मग काय—दसऱ्याचा आनंद द्विगुणित झाला. गावासाठी जे करायचे, जे नको तेही त्यांनी केले. दशरथला त्यांच्या घरात कधीच “काय आहे?” असे कोणी पाहिले नाही—फक्त आनंद, उत्साह आणि आपुलकी होती. मुलांच्या जन्मामुळे त्यांचे आयुष्य सुखात गेले. मुलं मोठी झाली, समजदार झाली. त्या काळी फारसे शिक्षण नव्हते. मोठा मु...

माजलेले भिकारी – एक कटू वास्तव

इमेज
पोटापाण्यासाठी माणसं काय काय करतात…  कोणी नोकरी करतं, कोणी शेती करतात, कोणी वेगळा व्यवसाय करतात. काबाड कष्ट करणारी माणसं मजदूर, कामकरी मिळेल ते काम करून मात्र इज्जतीने आपलं दैनंदिन जीवन पार पडतात. मुलांचे शिक्षण, आरोग्य, घरदार हे कसं व्यवस्थित चालेल, याच विचारात असतात. प्रामाणिक कष्ट करणारा जो वर्ग आहे, त्यांना जे मिळेल त्यामध्ये समाधान असतं. चोरी-लबाडी करत नाहीत. नेहमी खऱ्याची बाजू धरून वागतात.  हेही जितकेच खरे आहे… अशा लोकांना जास्त दुःख असतं; मात्र दुःख शोषूनही सुखासाठी कधी चुकीची कामं करत नाहीत. अशी माणसं देवाला प्रिय असतात. पण आता अशी माणसं मिळणं दुर्मिळ झालं आहे. कोणी राजकीय फायदा घेतो, कोणी योजना लुबाडतो, कोणी मिळेल तेथे हात मारतो, तर कोणी गरीबांची जमीन फसवून काही आमिष दाखवून लुबाडतो आणि त्यांना भूमिहीन करतो.  अशा लोकांची आता ज्यादा चलती आहे. पण इतकंही खरं आहे की त्यांचं ते सुख तात्पुरतं… कायम दुःख त्यांना सहन करावं लागतं, हे नाकारता येत नाही. हकीकत अशी आहे की जेवढं काही कष्ट न करता मिळेल, फुकट फायदा मिळेल, तिकडे लोकांची गर्दी वाढली आहे.  आता हेच लोक वेगवेगळ्य...

शेवटी हत्यार खाली ठेवली

इमेज
आमचा सर्व कामधंदा आणि गुजराण ही जंगल-वनस्पती, डोंगर-दऱ्यांमध्येच. जे काय मिळेल तेच काही दिवसांची शिदोरी. वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या आम्ही हेच काम करत आलो. नदी-नाले ओलांडले, आणि त्यामधून जे मिळेल तेच पोटाची शिदोरी. पण हे जंगल आहे म्हणूनच आमचं गुजराण झालं. आमच्या गुराढोरांना चारा मिळाला, आम्हाला लाकडं-फाटा मिळाला, औषध मिळालं. या जल-जंगल संपत्तीने आम्हाला बरंच काही दिलं. आम्ही त्याला डोंगर देव, वाघ देव मानलं. जंगलातले प्राणी-पक्षी हे तर आमचं शिकारीचं साधन. आम्ही बराच अत्याचार केला त्यांच्यावर. त्यामुळे जंगल बरंच नष्ट झालं आणि प्राणिमात्रही कमी झाले. म्हणून आज माणूस आणि प्राणी यांची अस्तित्वाची लढाई आपण पाहतो. एक दिवस मी शांतपणे माझ्या गावाबाहेर पडवीत झोपलो होतो. पडवीत गाई-म्हशी खाल्लेला चारा खाऊन रवंथ करीत होत्या .  वर कारव्याच्या मांडणीवर चार-पाच शेळ्या बसल्या होत्या. खुराड्या मध्ये कोंबड्या होत्या.  मी आतील लाकडी फळ्यांच्या माचोळीवर झोपलो होतो. अचानक, माझ्या स्वप्नात एक साप आला आणि मला इशारा करू लागला “आमच्यावर अत्याचार होतोय, तू आम्हाला मारायला उठलाय!”  मी घाबरलो आणि ...

नाही हारणार – एक सत्यकथा

इमेज
व्यसनाच्या आहारी गेलेल्या माझ्या नवऱ्याने बरंच काही केलं, पण सुधारणा काहीच झाली नाही. अखेरीस तो गेला. पदरात पडलेली दोन मुलं… त्यांचा सांभाळ करायला मी कमरेला पदर बांधला. कोणाच्या घरीदारी काम करायचं, तर कोणाची मजुरी करायची. आणि ज्या जमिनीचा तुकडा आमच्या वाटेला होता, तो थोरल्या भावाने हिसकून घेतला. आम्हाला घरातून बाहेर काढून दिलं. मग ती दोन मुलं पदरी झाकून मी इकडे तिकडे काम शोधू लागले. “हार नाही मानायची” असंच मी स्वतःला सांगितलं. गावातील लहानमोठी कामं करून कुटुंबाचा गाडा ओढत होते. अखेरीस माझ्या एका ओळखीच्या बाईच्या सांगण्यावरून मुलांना घेऊन शहरात आले. झोपडपट्टीत पत्र्याची एक झोपडी घेतली झोपडी कसली, गावातील डुकरांच्या तबेल्यासारखीच. पण साफसफाई करून त्यातच संसार सुरू केला. मुलं हळूहळू मोठी झाली. मुलगी मोठी असल्याने घरातलं काम करू लागली आणि शाळेतही जायची. मुलगा छोटा होता; त्याला बाजूच्याच सरकारी शाळेत टाकलं. दोघंही शिकू लागली. आणि मी भांडीकुंडी, झाडलोट अशी चार–पाच कामं दररोज करू लागले. सकाळी घर सांभाळून कामाला जायचं, दिवसभर धावपळ करायची, संध्याकाळी  जेवण बनवायचं—हीच दिनचर्या. हळूहळू वय च...

त्यांच्या कष्टावर , पैशावर जगायचं

इमेज
शेतकरी कष्टकरी श्रमिक यांच्या धन धान्य , साहित्य अलगद वापरायचे आणि त्यांच्या कष्टाच्या पैशा वर आम्हाला जगायचे  त्यांना काबड कष्टातून आम्हाला बाहेर नाही काढायचे त्यांच्या कष्टावर त्यांच्या पैसा वर वाटल तेवढा टॅक्स बसवून त्यांना बनवायचे आणि त्यांच्याच पैशावर आम्हाला मनसोक्त जगायचंय  निवडणुकीमध्ये वाटल तेवढी आश्वासन देऊ प्रत्यक्षात त्यांच्या हाती गाजर देऊ आणि मजा घेऊ असं जरी असलं तरी त्यांच्याच जीवावर आम्हाला जगायचे त्यांची सर्व परी पिळवणूक करू त्यांचा रक्त शोषून त्यांना मारझोड करू वरडून आरडून मेले तरी त्याची काही नाही पडली तरी पण त्यांच्याच कष्टावर पैशावर आम्हाला जगायचे अहो हे कसले लोक आम्ही म्हणजे सर्वस्वी देव माणूस ही सर्व जंगलातील दगड गोटे त्यांना आम्ही फोडून तोडून सर्व काही त्यांचं घेऊ त्यांना तात्पुरती एखादी चपटी देऊन त्यांचं सर्व काही काढून घेऊ  निवडणुकीमध्ये वेगळी वेगळी आश्वासन देऊ त्यांना मात्र आम्ही असंच भुलवत राहू तरीपण त्यांच्या जीवावर कष्टावर जगायचं त्यांच्या जीवावर आमचं लाखोचं करोड करोडचा अब्जे करू आणि ह्या देशातून पळून जाऊ या देशातले धनवंत होऊ ह्या देशात...

चहा पेक्षा किटली गरम

इमेज
निवडणुकीची धावपळ सुरू झाली की काही सामाजिक कार्यकर्ते झोपेतून जागे होतात. जिकडे मिळेल तिकडे उमेदवारांच्या मागे पळू लागतात.  जिथे आपलं बस्तान बसेल तिथे बसतात, तर कधी मध्येच उठून दुसऱ्या ठिकाणी जायला कमी करत नाहीत. अशाच प्रकारचे अनुभव सध्या राजकीय नेत्यांना आणि उमेदवारांना येत आहेत. “अरे हा काल त्या पक्षाचं काम करत होता, आज या पक्षात आला आणि  इकडच्या-तिकडच्या बातम्या देत बसतो.” कधी हे कार्यकर्ते हया वाडीत, कधी त्या गावात, कधी विरोधकांसोबत सुद्धा फिरतात; उमेदवार देखील त्यांच्यावर विश्वास ठेवतात. जो मिळेल त्याला नमस्कार करतात, आणि अशा कार्यक्रमांमध्ये शक्यतो कोणाला नाराज करत नाहीत. कोणाची आश्वासनं काय, कोणाचं योजना पत्र कसं – हे पाहून काही कार्यकर्ते आपली ‘चलाखी दाखवतात.  “पाच वर्षात ठरलेला कार्यक्रम असा असेल” आमचा उमेदवार असा विकास होणार, तसा विकास करणार असा देखील ते दावा करतात. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. गावोगावी, गल्लीबोळात फिरत असताना कोणी साड्या वाटतंय, कोणी पुस्तकं देतंय, कोणी कपडे देतोय, कोणी ब्लॅंकेट  देतोय जसा काही महापौरच चाललाय! लोकही घेतात, कारण पाच वर्...

अंधार

इमेज
अहो, आता कुठेतरी गावाला, वाड्या-पाड्याला कच्चा रस्ता आला; एक-दोन बल्ब लागले; चार-पाच खांब उभे राहिले. नाहीतर आमचं आयुष्य आयुष्यभर अंधारातच गेलं असतं. आम्ही जंगलात राहणारे, डोंगरदऱ्यांत वसलेले. आमच्या जमिनीतून, डोंगरदऱ्यांतून वाहणाऱ्या पाण्याने नद्या भरल्या आणि तेच पाणी पुढे शहरांपर्यंत पोहोचून तुमचं जेवण झालं. आम्ही झाडं जगवली, जंगलाचं रक्षण केलं. त्यामुळेच हवा मिळाली, जीवन मिळालं. गावातली माणसं बॅटरी नसताना, त्या काळात खंदील घेऊन, रॉकेलच्या थेंबावर रात्री इकडे-तिकडे फिरायची. गोठ्यात, घरात साप फिरायचे; जंगलात जंगली जनावरं फिरायची; पण कसलीही भीती नव्हती. सर्व देवांवर विश्वास ठेवून मंडळी जगायची. रात्रीच्या अंधारात जत्रेला जायचो, जीवनाचा आनंद घ्यायचो. आम्ही गरीब माणसं होतो, पण देशासाठी महान होतो. तरीसुद्धा आमची दखल कुणीच घेतली नाही. आंध्रात एका मुलाने रॉकेलच्या बाटलीच्या उजेडात अभ्यास केला होता. तो दहावी पास झाला. देशाच्या सीमेवर सेवेसाठी, बॉर्डर प्रोटेक्शन फोर्समध्ये आमच्या तालुक्यातल्या तानाजी नावाच्या मुलाची निवड झाली. आख्या गावात आनंद उसळला. “देशासाठी आपला मुलगा गेला” याचा अभिमान होता...

माजला का रे…?

इमेज
ग्रामीण भागातील आजही परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे की दैनंदिन आहारासाठी, मुलाबाळांच्या पोटासाठी सकाळी काम करायचे आणि संध्याकाळी खायचे हीच कडू वास्तवता आहे.  विशेषतः पालघर, जव्हार, मोखाडा, नंदुरबार, धुळे, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर अशा आदिवासी व दुर्गम भागांत ही परिस्थिती आजही ठळकपणे दिसून येते. शासन म्हणते हे केलं, ते केलं; मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही.  गरीब माणूस आजही तसाच गुदमरून जगतो आहे, उपाशीपोटी राहत आहे. कितीतरी मुलं भूकबळी पडत आहेत. याची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे;  पण राजकारणी, श्रीमंत वर्ग, करोडपती सिनेअभिनेते, धनिक व सत्ताधारी लोकांनी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे. त्यांना हे सर्व दिसत असूनही, “मरू दे तिकडे” अशीच मानसिकता त्यांनी स्वीकारली आहे. या गोरगरीबांना काहीतरी बोलायचे असते, पण ते बोलत नाहीत. त्यांचा आवाज, त्यांचे स्वातंत्र्य, त्यांचा स्वाभिमान या सगळ्यांचा फायदा उच्चवर्गीय व नोकरशाहीने दडपशाही करून घेतला आहे. कष्टकरी माणूस पहाटे उठतो, अर्धी चतकोर भाकरी कमरेला बांधतो आणि मिळेल ते काम करतो कधी...

कान उघड

इमेज
समाजामध्ये माणसांच्या अनेक इच्छा-आकांक्षा दडलेल्या असतात.  त्या पूर्ण करण्याच्या नादात आपण कुठे थांबायचे आणि कुठपर्यंत जायचे, याचे भान अनेकदा राहत नाही. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की सर्व काही हातातून निसटून जाते आणि शेवटी पश्चात्तापाशिवाय काही उरत नाही. अशाच काही उदाहरणांमधून ही कथा सांगते — अतिरेक किती घातक ठरतो याची जाणीव करून देणारी. आमच्या गावात एक माणूस होता. तो सकाळीच अड्ड्यावर जायचा, एखादी अर्धी-चपटी हाणायचा आणि मग कामाला जायचा. संध्याकाळी परत येताना गावाच्या हद्दीपर्यंत येईपर्यंत त्याच्या तोंडाची माशीही उडायची नाही. पण गावाच्या हद्दीत पाऊल टाकताच त्याचा आवाज बदलायचा. जाताना कोणाला भावकीत, कोणाला गावातल्या लोकांत — “मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडे हे आहे, ते आहे, मी अख्खा समाज विकत घेईन” अशी नको ती बडबड सुरू व्हायची. हा गर्व, हा अतिरेक इतका वाढला की शेवटी त्याच्याच मुलाशी वाद झाला. घरात शांतता राहिली नाही आणि अखेरीस त्याला घराबाहेर काढले गेले. अतिरेकाने माणूस स्वतःचं घरही गमावतो, हेच यातून दिसून आलं. आपल्याकडे कोरडवाहू शेती आहे. शेतीवर सतत सेंद्रिय खतांचा मारा केला, किं...