असं आहे का राजकारण?
असं आहे का राजकारण? अख्खा समाज बोलतोय, वाड्या-पाड्यांमध्ये दरी निर्माण करतोय, भावकीमध्ये भांडण लावतोय, तंटामुक्ती करण्याऐवजी तेढ निर्माण करतोय — असं काय आहे राजकारण? कोण कुणाचा भाऊ पळवतोय, तर घरातील माणसं फोडतोय, अखी समाज व्यवस्था विस्कळीत करतोय असं आहे का राजकारण? एका गावात अनेक पक्ष, एकमेकांची डोकी फोडतोय, समाजाचं हित सोडून स्वार्थासाठी भांडतोय. समोर येता गोड बोलतोय, मागं मात्र वैरी होतोय. कोण कोणाला मारतोय, निवडून आल्यानंतर जो-तो बाजूला होतोय. पडलेला राजकारणी दुसऱ्याचा बदला घेतोय, आणि एखादा तिसरा निवडणुकीत पडला म्हणून दिलेले पैसे परत मागतोय — असं आहे का राजकारण? पूर्वी पाटील बोलायचा ते घडायचं, आता गटातटामुळे भलतंच घडतंय. त्यामुळे समाज प्रगतीपासून दूर ढकलतोय. कधी इकडं, कधी तिकडे, स्थिर नाही. पक्ष समाजाचा फायदा घेऊन आपलं पोट भरतोय — असं आहे का राजकारण? हे करतो, ते करतो असं म्हणत सुटतोय, पण निवडून आल्यानंतर काहीच नाही करतय. महिना-दीड महिना दारोदार फिरतोय, तरुणांना फितवतोय, त्यांना सर्वकाही देतोय, आणि त्यामध्येच आम्ही गार होतोय — असं आहे का राजकारण? ना रस्ता, ना शिक्षण, ना आरोग्य —...