पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमजद खान

इमेज
तेरे जैसा यार कहाँ ... अमजद खान! (जन्म : १२ नोव्हेंबर १९४३, मृत्यू : २७ जुलै १९९२) चित्रपट, मग तो कोणत्याही भाषेतील असो त्यात नायका इतकंच महत्व असतं ते खलनायकाला. कारण ही दोघंही चित्रपटाच्या कथेचा केंद्रबिंदू असतात. सामान्यपणे नायक, नायिका, चरित्र नायक/नायिका, विनोदी नायक/नायिका यांना जितकी लोकप्रियता मिळते त्या तुलनेत खलनायकाच्या वाट्याला ती कमीच येते.  पण हा समज आणि पायंडा खोडून काढणारे काही खलनायक चित्रपटसृष्टीला लाभले. या श्रेणीत सर्वात अग्रीम स्थान मिळालं ते अमजद खान यांना.  हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायकाची पारंपरिक चौकट तोडत खलनायकाला नायका इतकीच उंची प्रदान करणाऱ्या अमजद खान यांनी एक इतिहास घडवला आणि त्यानंतर नकारात्मक भूमिकेत आपली अभिनय कारकीर्द करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी त्यांनी 'अच्छे दिन' ची सुरुवात केली. रुपेरी पडद्यावर विकृत खलनायक साकारणारे अमजद खान हे उच्च विद्याविभूषित होते. मुंबई विद्यापीठात पार्शियन विषयातील ते टॉपर विद्यार्थी होते.  अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी पत्रकार होण्याची त्यांची इच्छा होती. यासाठी काही काळ त्यांनी वृत्तसंस्थेत देखील क...

जयश्री गडकर

इमेज
जयश्री गडकर जयश्री यांचा जन्म २१ मार्च १९४२ साली कर्नाटकच्या कारवार जिल्ह्यातील सदाशिवगड या गावी एका साध्या कोकणी कुटुंबात झाला.  जयश्री गडकर या पाच वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब कामासाठी मुंबईत आलं आणि इथेच स्थायिक झालं.  त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळेत झाले. शिक्षणाची आवड असतानाही त्यांना फारस शिक्षण घेता आलं नाही. त्यांना गाण्याची आणि नृत्याची लहानपणा पासूनच आवड होती. त्यामुळे आपसुकच कला क्षेत्राशी त्यांची ओढ अधिक होती. त्यांनी लहानपणीच नृत्य शिकण्यास सुरूवात केली.  प्रसिद्ध कथ्थक नर्तक गुरू गोपीकृष्ण यांच्याकडे त्यांनी कथ्थक नृत्याचे आणि पुढे जाऊन गायनाचे धडे घेतले. तमाशा' हा जयश्री यांनी बालकलाकार म्हणून केलेला पहिला सिनेमा होता. त्यानंतर १९५५ साली व्ही. शांताराम यांच्या 'झनक झनक पायल बाजे' या सिनेमात जयश्री गडकर यांना एका नृत्य करणाऱ्या मुलींच्या भुमिकेसाठी घेतलं होतं. तेव्हा त्याचं वय अवघं १३ वर्ष होतं.  पुण्यातील एका कार्यक्रमात नृत्य सादरी करण करत असताना राम देवताळे या फोटोग्राफरनं जयश्री यांचे फोटो त्याच्या स्टुडिओमध्ये लाव...

अमोल पालेकर सर्वसामान्यांचा हिरो

इमेज
अमोल पालेकर. अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ रोजी मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पालेकरांच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. त्यांचे वडील पोस्ट ऑफिसमध्ये तर आई एका खासगी कंपनीत कामाला होती. पालेकर यांनी आपल्या कारकिर्दीला मुंबईतील प्रसिद्ध कॉलेज जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून कलाकार म्हणून सुरुवात केली.  अमोल जेजे स्कूल ऑफ फाइन आर्ट्समध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांनी आपला खर्च भागवण्यासाठी टायपिंग शिकवले. पदवीनंतर अनेक ॲड एजन्सी मध्ये काम केले. त्यानंतर त्यांना बँकेत कारकूनाची नोकरी लागली, त्यामुळे दिवसा बँकेत काम आणि रात्री रंगकाम करायचे. मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा कलावंत ते संवेदनशील दिग्दर्शक असा अमोल पालेकर यांचा प्रवास आहे. सत्तरच्या दशकांत आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना रिझवले. सत्तरच्या दशकात एकीकडे अमिताभ बच्चन यांच्या रूपाने अँग्री यंग मॅन उभा रहात होता. त्याचवेळी देशात मध्यमवर्गही वेगाने वाढत होता.  या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा नायक नव्हता. अमोल पालेकर यांनी ही गॅप भरून काढली. त्यांची...

गुरुदत्त

इमेज
हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले एक स्वप्न. लाभलेले वरदान. त्यांच्याशिवाय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. त्यांचे आयुष्य हे एका चित्रपटाचा विषय होऊ शकेल. आज ९ जुलै गुरुदत्त यांचा जन्मदिवस. आरपार, कागज के फूल, चौदहवी का चाँद, प्यासा, बाजी, साहिब बीबी और गुलाम, सी.आय.डी. असे काही नावाजलेले चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांचे चित्रपट त्यातला जिवंतपणामुळे ते कायम स्मरणात राहतील. गुरुदत्त यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात अबरार अल्वी यांचा सक्रिय सहभाग होता.  त्यांच्या आयुष्यात खरे तर ते दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व जगले. आयुष्यात दोन स्त्रिया आल्या. दोन्ही त्यांच्या प्रेरणा होत्या. पत्नी गीता दत्त आणि अभिनेत्री वहिदा रहमान. गीता दत्त त्यांच्या पत्नी होत्या, तर सी. आय. डी. या चित्रपटापासून वहिदा रहमान त्यांच्या आयुष्यात आल्या.  गुरुदत्त एक जागतिक पातळीवर निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतादेखील होता. त्यांना साहित्याची, संगीताची जाण पराकोटीची होती. पण, अभिनय ही त्यांची पहिली पसंती नव्हती तरीही त्याच्या सहज, संवेदनशील आणि नैसर्गिक अभिनयाचं गारुड रसिक प्रेक्षकांवर कायम ह...

सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा

इमेज
नयनतारा यांचा जन्म ५ जुलै १९५० रोजी झाला. नयनतारा यांनी अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर राज्य केले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.  त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपटात काम केले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेले "शांतेचे कार्ट चालू आहे" या नाटकात लक्ष्मीकांत यांच्या आईच्या भूमिकेत आपल्याला नयनतारा यांना पाहायला मिळाले होते.  या नाटकातील नयनतारा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.  त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांना ऑन स्क्रीन वरील लक्ष्मीकांत यांची आई असे देखील म्हटले जात असे. नयनतारा यांनी अशी ही बनवाबनवी (१९८८) आई पाहिजे (१९८८) आधार (२००२) आनंदी आनंद, (१९८७)  कुंकवाचा करंडा (१९७१) खुळ्यांचा बाजार (१९९२) जिगर (१९९८) तू सुखकर्ता (१९९३) धांगडधिंगा (१९९९) बाळा गाऊ कशी अंगाई (१९७७) सगळीकडे बोंबाबोंब (१९८८),  च...