पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ॲक्शन आणि म्युझिकल फिल्म मोहरा

इमेज
१ जुलै १९९४ ला मोहरा रिलीज झाला होता. तू चीज बडी है मस्त मस्त ह्या गाण्याने त्या काळात धुमाकूळ घातला होता. रिक्षा, रसवंती गृह, कटिंग सलून आणि घरोघरी हेच गाणं लूप वर वाजत होतं.  ना कजरे की धार,  सुबह से लेकर शाम तक.. मुझे प्यार करो, आणि एक स्पेशल गाणं, जे आम्हाला तेव्हा चोरून बघावं लागायचं.( ते टिव्ही वर लागलं की चॅनल बदललं जायचं किंवा VCR वर पाहत असल्यास फास्ट फॉरवर्ड केलं जायचं. ) ते आयकॉनिक गाणं " टीप टीप बरसा पानी"  एकंदर सगळीच गाणी जबरदस्त असल्यामुळे त्याची ऑडिओ कॅसेट खूप खपली.  राजीव राय ह्या गुणी दिग्दर्शकाने आणि त्रिमूर्ती फिल्म्स ह्या त्याच्या प्रॉडक्शन हाऊस ने विश्वात्मा , त्रिदेव, गुप्त, यांसारखे क्लासिक सिनेमे दिले आहेत. विजू शाह ह्या त्याच्या आवडत्या म्युझिक दिग्दर्शकाने ह्या सगळ्याच सिनेमात अजरामर गाणी आणि संगीत दिलेलं आहे.  मोहरा हा एक कमालीचा भारी ॲक्शन ड्रामा आहे. त्या काळात सगळे अभिनेते एकमेकांबरोबर गुण्या गोविंदाने नांदायचे ( गोविंदा सुद्धा ) त्यामुळे अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ही प्रेक्षकांची अतिशय आवडती जोडी घेऊन मोहरा काढण्यात आला तेव्हा ...

बिना का गीतमाला

इमेज
  १९५५चा भारतीय  फिल्मफेअर आणि बिना का गीतमाला 1955 मध्ये दुसरा भारतीय फिल्मफेअर पुरस्कार हिंदी चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना जाहीर झाले.  सहाय्यक अभिनेत्री चा पुरस्कार उषा किरण यांना "बागवान" या चित्रपटासाठी देण्यात आला. सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार डेव्हिड चौलकर यांना "बूट पॉलिश" या चित्रपटासाठी मिळाला. तर उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार हा एस डी बर्मन यांना  चित्रपट "टॅक्सी ड्रायव्हर " जाये तो जाये कहा, या चित्रपटासाठी मिळाला. उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार हा मीना कुमारी यांना "प्रणिता" या चित्रपटासाठी देण्यात आला. तर उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार भारत भूषण यांना "चैतन्य महाप्रभू" या चित्रपटासाठी मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार  बिमल रॉय यांना "प्रणिता "या चित्रपटासाठी देण्यात आला. 1955 चा उत्कृष्ट चित्रपट "बूट पॉलिश" या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. 1955 मध्ये श्री 420 ,नास्तिक, मुनीमजी, झनक झनक पायल बाजे, सीमा, बाप रे बाप व तांगेवाली असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी बिनाका गीतमाला ...

संगीत प्रधान चित्रपट बैजू बावरा

इमेज
  संगीत प्रधान चित्रपट बैजू बावरा  आज आपण घेणार आहोत हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीत क्षेत्राचा आढावा 1952 साली प्रदर्शित झालेल्या "बैजू बावरा" या चित्रपटाला 1954 चा पहिला भारतीय फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला तो म्हणजे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक नौशादजी यांना.  बैजू बावरा या सिनेमात भारत भूषण आणि मीना कुमारी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची गाणी शकील बदायुनी यांनी लिहिली होती तर संगीत साथ नौशाद जी यांनी. या चित्रपटाची गाणी मोहम्मद रफी, लता मंगेशकर शमशाद बेगम,पंडित आमिर खाँ व दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांनी गायली होती. बैजू बावरा हा एक संगीत प्रधान चित्रपट होता. या चित्रपटातील ' तू गंगा की मौज और मै यमुना का धारा' हे गीत रफी साहेबांनी अतिशय सुंदर असं गायलेले आहे. आजही ही हे गीत ऐकले की मन प्रसन्न होऊन टवटवीत आणि ताजेतवाने होते व वेगळाच आनंद देते.                          या चित्रपटातील दुसरं गीत होतं "आज गावात मन मिरो झुमके". हे गीत पंडित आमिर खाँ आणि दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांनी गायलं होतं. हे गाणं क्लासिक...