पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवदानी आसरे

इमेज
ग्रामीण भागातील आदिवासी गावाला त्यावेळेस कसल्या शाळा आणि कसलं काय? त्यावेळी शिक्षणाच्या कोणत्याच सुविधा वाड्यावसत्या आणि दुर्गम भागात झालेल्या नव्हत्या. शिक्षण घ्यायचा असेल तर खूप लांबच्या एखाद्या गावी शाळा असलेल्या ठिकाणी घ्यावे लागे. दुसऱ्याचे एखादं पोरगं बाहेरगावी शाळेत गेलं तर आई-वडिलांचा उर भरून यायचा. माझ्या बाबतीत तसंच घडलं. कदाचित पाच सहा वर्षाचा असेल आजी म्हणाली किसना याचं नाव आश्रम शाळेत घाल. मी लहानपणी आजोळी वाढलो किसना माझा मामा. दुसऱ्या दिवशी मामा दूरवरच्या आश्रम शाळेत गेला. दिवसभर चालून संध्याकाळी शाळेत माझे नाव घालून आला.  मग एके दिवशी शाळेत जायचं माझं निश्चित झालं. मला शाळेत घातलेली आश्रम शाळा ही खूप लांब होती. चार तास पायपीट करावी लागायची.  आजीने माझी पिशवी भरली आणि दुसऱ्या दिवशी पोरगं शाळेत जाणार म्हणून कोपऱ्यात रडत बसली. म्हातारा म्हणाला शिकायला जाणार आहे ना तो मग कशाला रडते. मग आजीने पदर लगेच सरकावून डोळे पुसले.  सकाळी म्हातारी लवकर उठली शाळूच्या दोन-तीन भाकरी केल्या. त्याच्यावर दोन-तीन बेसनाची थापलेले डांगर तयार केले. थापलेले डांगर पाहिल्यवर मला आनंद ...

रफू

इमेज
खेड्यात माझं एक पडकं घर होतं गवत कारविणे जसं रफू केलं होतं गळक्या गोठ्यात गाईचं वासरू हंबरत होतं दूरवर चरत असलेल्या गाईच्या आवाजानं  गाईच्या आवाजानं गुपून रपून ठेवलं होतं गवत राखून ठेवलं होतं खेड्यात माझं एक पडकं घर होतं घरासमोर एक बाभळीचं झाड होतं त्याला काटे असूनही ते शांत उभं होतं झाडाच्या फांदीवर पक्षाचे घरटं होतं काठात गुफर रपून ठेवलं होतं खेड्यात माझा एक पडकं घर होतं गवत कारुविने त्याला रफू केलं होतं घरासमोर एक मुंग्याचं वारूळ होतं त्यांना मी कधीच अलिप्त झालेलं पाहिलं नव्हतं पण काल परवा मुलाचं लग्न झालं त्यांनी आम्हाला लगेच अलिप्त केलं होतं खेड्यात माझा एक पडकं घर होतं पशु प्राणी फुल झाड एकत्र नांदत होतं मात्र माणसातील माणसं एकामेकापासून दूर होतं खेड्यात माझं एक पडकं घर होतं गवत कारविने जसं रफू केलं होतं. कवी :- सुदाम मदगे (किवळे,वडगाव मावळ जि. पुणे) ही कविता सुदाम मदगे यांची आहे, आणि ती खरंच खेड्याच्या जीवनाची, नैसर्गिक वातावरणाची आणि घराची आठवण अधोरेखित करते. मी थोडक्यात तिचा अर्थ आणि भावना समजावून सांगतो. कविता विश्लेषण: 1. खेड्यातील घराची आठवण कवी आपलं पडकं (सोपं, छोटे) ...

आजच्या गावांची दैन्यावस्था

इमेज
साधारण 80 ते 90 च्या दशकात गावाकडे जाण्यासाठी चांगले रस्ते नसत. बैलगाडीचा प्रवास हाच एकमेव आधार होता. गावात एक दोन जणांकडेच फक्त सायकली असायच्या. देव धर्माला किंवा लग्नकार्याला जायचे असेल तर लोक भल्या पहाटे बैलगाडी जुंपून निघत असत. बैलगाड्या घेऊन डोंगर दर्या ओलांडून लोक इच्छित स्थळी जात असत. भर दुपारी निवांत एका झाडाखाली बसून बैलगाडीचे बैल सोडून झाला झाडाखाली बांधत. त्यांना आणलेली वैरण खायला घातलेली असे. जवळच झाडाखाली बैलगाडीतून आलेले लोक पंगतीने घरी होऊन आणलेले जेवण करत. बैल सुद्धा वैरण खाऊन पाणी पिऊन रवंत करीत असत. आणि मग थोड्या वेळाने परत गाडी जुंपून लोक पुढच्या प्रवासाला निघत. असा तो काळ होता. एकमेकाकडे पाहुणे म्हणून जायचे असेल तर लोक शक्यतो पायीच प्रवास करायचे. पाहुणा आल्यावर घरातील सदस्यांना खूप आनंद व्हायचा. पाहुणे आल्यावर घराच्या ओटीवर घोंगडी अंथरली जायची. घोंगडीवर बसण्याची मजा वेगळीच होती. घोंगडी वर बसून पितळीतील गुळाचा चहा पिताना एक वेगळाच आनंद व्हायचा. पाहुणा आला म्हणजे चांगल्या प्रकारे उठबस व्हायची. आजूबाजूची माणसं विचारपूस करायची. सुखदुःखाच्या गप्पा होत असत. त्यामुळे आजूबा...

अति लाडाने वाया गेलेले पोर

इमेज
म्हातारा म्हातारी पडवीत बसली होती. पडवी कसली हो ती? गोठाच होता. एका बाजूला गुरे बांधण्याची जागा. व दुसऱ्या बाजूला माणसे राहायची. दोन-तीन भांडी. काही गाडगी, मडकी  पाण्याचा एक हंडा, एक दोन डबे व दारात धान्य साठवण्याची कनगुली. त्यावर घडी घालून ठेवलेल्या दोन-चार गोधड्या, शेजारी जुनी घोंगडी एवढाच काय तो संसार.  म्हातारा चुलीला पाठ लावून बसला होता. पडवीच्या कोपऱ्यात कुत्र्याचं एक छोटा पिल्लू बसलं होतं. आजींने माझ्या हातात नाचणीची भाकरी व नारळाच्या कवटीत ठेवलेली लसणाच्या चटणीचं बोट भाकरीवरून ओढून मला ती भाकरी खायला दिली होती. मी ती भाकरी खात असता अचानक ते लहान कुत्र्याचे पिल्लू माझ्यापाशी आलं आणि माझ्या हातातील  भाकरी ओढू लागले.  मला त्या कुत्र्याच्या पिल्लाचा भयंकर राग आला. मी काठी घेऊन त्याला मारू लागलो. त्यावर ते क्याव क्याव करत त्याच्या जागेवर जाऊन बसले.  तेवढ्यात आजीच बोलली.  अरे बाळा! आपल्याला जसा जीव असतो तसाच त्या कुत्र्याच्या पिल्लालाही जीव असतो.  नको मारू त्याला.  म्हातारीने लगेच दुसरा भाकरीचा तुकडा मला दिला.  दुसऱ्या बाजूला माझा मामा राहत...